TCS Employee Case: टीसीएस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

महिला सहकाऱ्यांच्या मानसिक छळाचा आरोप; सुसाइड नोटमुळे आयटी क्षेत्रात खळबळ
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पिंपरी: हिंजवडीतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊनआत्महत्या केली. टीसीएस कंपनीतील या घटनेने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault
Pune Metro Feeder Service: पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू

अमित अभय ब्रह्मे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी विनोद जेठालाल पालीचा तसेच हिंजवडीतील टीसीएस कंपनीतील अर्चना आणि शाश्वती (वय व पूर्ण नाव माहित नाही) या दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचा मुलगा अनिश अमित ब्रह्मे (१९, रा. भोसरी) याने मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Assault
Male Mental Health: हिंजवडी आयटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत

भोसरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक केतन मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ब्रह्मे हे हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत कार्यरत होते. त्यांनी २ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही व्यक्तींमुळे होत असलेल्या मानसिक त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. टीसीएसच्या डीईजी प्रकल्पात कार्यरत असलेल्या अर्चना आणि शाश्वती या महिला कर्मचाऱ्यांकडून अमित ब्रह्मे यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांच्या हातातील महत्त्वाचे प्रकल्प काढून घेणे, अपरिचित कामे सोपविणे, सर्वांसमोर अपमान करणे, नोकरी सोडण्याचा सल्ला देणे तसेच कामाबाबत नकारात्मक अभिप्राय देण्याची धमकी देणे, अशा प्रकारे त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत होता.

Assault
Talegaon Road Encroachment: तळेगाव स्टेशन परिसरात रस्त्यावर बांधकाम साहित्यामुळे नागरिक त्रस्त

अमित यांची पत्नी असाध्य आजाराने त्रस्त असल्याने तसेच, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अमित ब्रह्मे आधीच तणावाखाली होते. त्यातच सातत्याने होणारा मानसिक छळ, बदनामी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक यामुळे ते नैराश्यात गेले होते. अखेर या सर्व प्रकारांना कंटाळून त्यांनी २ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक केतन मांजरे तपास करीत आहेत.

Assault
Pimpri Chain Snatching Arrest: पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईल पाठलाग; 15 लाखांचे दागिने चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद

ब्रह्मे यांच्याविरोधात खोट्या तक्रारी

आरोपी विनोद पालीचा याच्या पत्नीची आणि अमित यांच्या पत्नीची फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय निर्माण झाला. दरम्यान, कौटुंबिक वादातून पालीचा याची पत्नी परदेशात फिलिपिन्स येथे निघून गेली. ब्रम्हे दांपत्याने फितवल्यानेच आपली पत्नी परदेशात निघून गेल्याचा पालीचा याचा समज झाला. हा राग मनात धरुन पालीचा याने अमित ब्रह्मे यांच्याविरोधात चोरी व फसवणुकीच्या खोट्या तक्रारी केल्या. तसेच, वकिलामार्फत नोटिसा पाठविणे, कंपनीच्या अधिकृत ई-मेलवर बदनामीकारक संदेश पाठविणे अशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास दिला, असा आरोप अमित यांच्या मुलाने फिर्यादीत केला आहे. कंपनीतील दोन महिलांकडून होत असलेला छळ आणि विनोद पालीचा याच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारींमुळेच आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे अमित ब्रह्मे यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याचे अनिश याने फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news