Pimpri Crime: ताथवडे अत्याचार प्रकरण; पीडित मुलींना प्रत्येकी ५ लाखांची मदत, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी आठवलेंची मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामार्फत खटला चालविण्यासाठी प्रयत्न करणार
Minor Assault Case
Minor Assault CasePudhari
Published on
Updated on

पिंपरी: ताथवडे येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. त्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि. ४) भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असून, समाज कल्याण विभागामार्फत अत्याचारग्रस्त दोन्ही मुलींना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Minor Assault Case
Alandi Cyber Fraud Case: सायबर फसवणुकीचा मोठा पर्दाफाश; आळंदी पोलिसांच्या जाळ्यात म्युल अकाउंट पुरवठादार

ताथवडे येथील दोन अल्पवयीन मुलींवर एका ज्येष्ठ नागरिकाने अत्याचार केले. त्यामुळे शहरभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडित कुटुंबाची केंद्रीय मंत्री आठवले यांनी भेट घेतली. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Minor Assault Case
Pavana Closed Pipeline Project: पवना जलवाहिनी प्रकल्पाला मिळणार नवी दिशा; 13 जखमी शेतकऱ्यांच्या नोकरीच्या प्रस्तावामुळे हालचालींना वेग

महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामार्फत हा खटला चालविण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. समाज कल्याण विभागामार्फत अत्याचारग्रस्त दोन्ही मुलींना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Minor Assault Case
Lonavala Cyber Crime Awareness: सायबर फसवणुकीपासून सावध राहा; देशात दररोज १०० कोटींची डिजिटल लूट

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत पीडित कुटुंबाला प्रदान करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले यांनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करून त्यांना लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

Minor Assault Case
Lonavala Traffic Jam: लोणावळ्यात वाहतूक कोंडीचा विळखा; ५ मिनिटांच्या अंतरासाठी लागताहेत तब्बल एक तास

पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष उभी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, पक्षाचे शहराध्यक्ष नगरसेवक कुणाल वाव्हळकर, नगरसेवक राहुल कलाटे, धर्मपाल तंतरपाळे, नगरसेविका रेश्मा भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news