Talegaon Weekly Market Issue: तळेगाव आठवडे बाजारात बेशिस्तीचा कहर; रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी

नगर परिषदेच्या नियंत्रणाअभावी बाजारात गोंधळ; नागरिक, ज्येष्ठ व विद्यार्थ्यांना मोठा त्रास
Talegaon Weekly Market Issue
Talegaon Weekly Market IssuePudhari
Published on
Updated on

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथे दर रविवारी आठवडे बाजार भरतो. परंतु, या बाजारावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने व्यावसायिक भररस्त्यात दुकाने थाटत आहेत. यामुळे वाहनांना व नागरिकांना प्रवास करण्यासाठी रस्ता अरुंद राहत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आशा बेशिस्त बाजाराला शिस्त कधी आणि कोण लावणार, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

Talegaon Weekly Market Issue
Dehu Dehuroad Road Widening: देहू–देहूरोड रस्ता रुंदीकरणाची मागणी तीव्र; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

या बाजारामुळे नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत नकारात्मक भावना निर्माण होत आहे. आठवडे बाजारामध्ये जिजामाता चौक ते हिंदमाता भुयारी मार्ग या परिसरात भाजी विक्रेते तसेच इतर विक्रेते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने थाटून बसतात.

Talegaon Weekly Market Issue
PCMC Sanitation Workers Salary Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये ५५० कचरा कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; प्रशासनाविरोधात संताप

तसेच बाजारासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यात व दुकानासमोर बेशिस्तपणे पार्क करतात. या सर्व कारणांमुळे संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत असून, पादचारी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत.

Talegaon Weekly Market Issue
Pimpri Chinchwad Property Tax Recovery: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर वसुली मोहीम तीव्र; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

बाजाराची सोशल मीडियावर चर्चा

तळेगाव येथे रविवारी भरत असलेल्या बाजाराची चर्चा आता सोशल मीडियावर चांगल्या गोष्टीसाठी नाही, तर येथील बेशिस्तीची होत आहे. नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर नागरिक करत आहेत. नगर परिषद व वाहतूक विभाग येथील बाजाराला शिस्त लावण्यात अपयशी ठरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील बेशिस्तीचे छायाचित्र व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Talegaon Weekly Market Issue
Kalevadi Job Fraud: रेल्वे व वन विभागात नोकरीचे आमिष; काळेवाडीत २१ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागास तसेच संबंधित विभागांना दर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश द्यावेत. बेशिस्तपणे रस्त्यावर व्यावसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर तसेच नियमबाह्य पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा.

गणेश काकडे, उपनगराध्यक्ष, तळेगाव दाभाडे नगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news