Kalevadi Job Fraud: रेल्वे व वन विभागात नोकरीचे आमिष; काळेवाडीत २१ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा

बनावट नियुक्तीपत्रे देऊन तिघांची फसवणूक; काळेवाडी पोलिसांकडून तपास सुरू
Job Fraud
Job FraudPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची २१ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल २०२३ मध्ये काळेवाडी येथे घडली.

Job Fraud
Pimpri Illegal Liquor Crackdown: फुगेवाडी दारूकांडानंतर पिंपरीत अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; देशी दारू विक्रीत मोठी वाढ

विक्रम पवार (रा. डांबरीतांडा, जि. जालना) आणि निलेश वाकचौरे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश सुरेश कुलकर्णी (३५, रा. सुसगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

Job Fraud
PCMC Municipal Secretary Dispute: पीसीएमसीत नगर सचिवांवरून गोंधळ; सभेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी हितेश कुलकर्णी तसेच अंकुश राठोड आणि प्रशांत जाधव यांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २१ लाख ८७ हजार ७३ रुपये घेतले.

Job Fraud
Pimpri Chinchwad Open Grounds: भोसरीत मोकळी मैदाने मद्यपींचे अड्डे; नागरिकांत भीतीचे वातावरण

त्यानंतर तिघांनाही रेल्वे आणि वन विभागातील बनावट नियुक्तीपत्रे व अन्य कागदपत्रे देण्यात आली. संबंधित कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर संबंधितांना पोलिसांकडे धाव घेतली. या घटेनचा पुढील तपास काळेवाडी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news