Talegaon Dabhade Diwali Bonus: तळेगाव दाभाडेतील २७५ कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ८.३३ टक्के बोनस जमा

अनेक वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा; कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत थेट रक्कम जमा
Talegaon Dabhade Municipal Council
Talegaon Dabhade Municipal Council Pudhari
Published on: 
Updated on: 

तळेगाव दाभाडे: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे २७५ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दिवाळी बोनस देण्यात आला आहे. एनडीके कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये इंडिके कंपनीच्या माध्यमातून बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Talegaon Dabhade Municipal Council
Children Selling Brooms During Diwali: दिवाळीच्या झगमगाटात चिमुकल्यांच्या हातात केरसुणी; बालपण हरवल्याचे वास्तव

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील आणि आरोग्य समिती सभापती निखिल भगत यांच्या सूचनेनुसार हा बोनस देण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या सभेत सर्व नगरसेवकांनी शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता दूतांना दिवाळी बोनस मिळावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार, प्रशासनाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

Talegaon Dabhade Municipal Council
Pimpri Chinchwad Diwali Fire Safety: दिवाळीत आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये २५० अग्निशमन कर्मचारी तैनात

तळेगाव दाभाडे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे सफाई कर्मचारी, कचरा संकलन कर्मचारी, वाहनचालक तसेच उद्यान विभागातील कर्मचारी गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता हे कर्मचारी नियमितपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात.

Talegaon Dabhade Municipal Council
Pimpri Chinchwad Stray Dogs Shelter: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे; एका कुत्र्यामागे रोज १०८ रुपये खर्च

विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत नव्हता. मात्र यंदा ८.३३ टक्के बोनस थेट बँक खात्यात जमा झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष, आरोग्य समिती सभापती तसेच सर्व नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Talegaon Dabhade Municipal Council
Pimpri Chinchwad Free Household Items: पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टीवासीय महिलांची दिवाळी होणार गोड; महापालिकेकडून संसारोपयोगी साहित्य मोफत

याप्रसंगी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, गटनेत्या हेमलता खळदे, आरोग्य समिती सभापती निखिल भगत, नगरसेवक विनोद भेगडे, सूरज सातकर, आशा भेगडे, मनीषा म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या या स्वच्छता दूतांची दिवाळी यंदा बोनसच्या आनंदामुळे अधिक गोड झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.