Pimpri Chinchwad Stray Dogs Health Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांचा आजार वाढतोय

लसीकरण मोहीम सुरू; नागरिकांकडून श्वान नियंत्रणाची जोरदार मागणी
Pimpri Chinchwad Stray Dogs Health
Pimpri Chinchwad Stray Dogs HealthPudhari
Published on
Updated on

खराळवाडी: पिंपरी शहरातील गांधीनगर परिसरात भटके श्वान आजारी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांचा बंदोबस्त होत नसल्याने शहरात आजारी श्वानांची संख्या वाढत आहे. त्याचा फैलाव इतर भागांत होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. तसेच येथील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Pimpri Chinchwad Stray Dogs Health
Pimpri ST Depot Water Problem: पिंपरी एसटी आगारात पाणीटंचाई; वर्कशॉपमधील स्वच्छतागृह सहा महिन्यांपासून बंद

गांधीनगर, खराळवाडी गावठाण, आत्मनगर, बजरंगनगर, कामगारनगर, विठ्ठल रखुमाई मंदिर, कर्मयोग सोसायटी, युनायटेड चर्च, सुदर्शन चौक, चांदणी चौक या परिसरात काही भागांत भटके श्वान आजारी पडल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. शहरात मोकाट श्वानांची वाढती संख्या नागरिकांना धोकादायक ठरत आहे. भटके श्वान आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या भटक्या श्वानांच्या आजारावर वेळीच उपचार आणि लस घेतली नाही, तर शहरातील अनेक भटके श्वान मोठ्या संख्येने आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pimpri Chinchwad Stray Dogs Health
Pimpri Fruit Market Mango Price: अक्षयतृतीयेला पिंपरीत आंब्यांची रेलचेल; महागाईमुळे मागणी कमी

श्वानसंख्या येईना आटोक्यात

श्वानप्रेमींकडून श्वान दगावल्यास संबंधितांना वेठीस धरले जाते. मात्र, श्वानदंशने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या घरी श्वानप्रेमी जातात का, असा संतप्त सवाल पीडित नागरिक करीत आहेत. महापालिकेने संबंधित यंत्रणांवरही श्वानप्रेमी संघटनांचा दबाव असल्याने श्वानांबाबत कारवाई करण्यावर दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. मोकाट श्वान पकडलेही जात नाहीत, तसेच त्यांची नसबंदी केली जात नसल्याने श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Pimpri Chinchwad Stray Dogs Health
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; पालेभाज्यांचे भाव वाढले

निरोगी राहण्यासाठी लसीकरण गरजेचे

लसीकरण केल्यानंतर श्वान निरोगी राहण्यास मदत होते. त्याचा प्रादुर्भाव इतरांना होत नाही. अंगावरील केस गळणे, गोचीड होणे, खरुज खाज येणे या आजारांपासून संरक्षण मिळते. हे लसीकरण ज्या ठिकाणाहून तक्रार केली जाते त्या लोकेशनवर जाऊन रोगप्रतिकारशक्ती लस देण्यात येते. यामुळे भटके श्वान आजारी पडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. यासाठी फिरते डॉग ॲम्बुलन्स वाहन प्रभागात जाऊन लसीकरण करते. अशी माहिती लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी पुढारीशी बोलताना दिली.

Pimpri Chinchwad Stray Dogs Health
Pimpri Crime: चाकणमध्ये राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी तरुणाला अटक

प्रभागातील भटक्या श्वानांसाठी लस उपलब्ध

आजारी श्वानाची तक्रार केल्यानंतर त्याठिकाणी फिरते डॉग ॲम्बुलन्स पथक जाऊन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देते. शास्रक्रिया करण्यासाठी किंवा उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था नेहरूनगर येथे करण्यात आली आहे. या मोहिमेत पशुधन पर्यवेक्षक अतिष कुराडे, डॉक कॅचर कुमार साखरे, वाहनचालक नीलेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित लसीकरणाची मोहीम गांधीनगर येथील दुर्गामाता मंदिर, भवानी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार येथे राबविण्यात आली.

निरोगी राहण्यासाठी डॉगची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी जाऊन लस दिली जाते. एक फिरते डॉग ॲम्ब्युलन्स प्रभागात उपचारासाठी फिरत असून, दुसरी फिरते डॉग ॲम्ब्युलन्स पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी फिरत असून, आजारी श्वानांवर तिथे जाऊन लसीकरण केले जाते.

डॉ. निरज हटवार, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news