Pimpri ST Depot Water Problem: पिंपरी एसटी आगारात पाणीटंचाई; वर्कशॉपमधील स्वच्छतागृह सहा महिन्यांपासून बंद

कर्मचाऱ्यांची गैरसोय; कामकाजावर परिणाम, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Pimpri ST Depot
Pimpri ST DepotPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारातील वर्कशॉपमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या असून, स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहेत. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे कामकाजावर परिणाम होत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार कर्मचारी वर्गातून केली जात आहे.

Pimpri ST Depot
Pimpri Fruit Market Mango Price: अक्षयतृतीयेला पिंपरीत आंब्यांची रेलचेल; महागाईमुळे मागणी कमी

वल्लभनगर परिसरातील या आगारामध्ये सध्या 50 एस. टी. बस आहेत. दररोज 31 बस फेऱ्या आगारातून सुटतात आणि तेवढ्याच बस परत येतात. याशिवाय दिवसभरात विविध आगारांमधील सुमारे 550 बस येथे ये-जा करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि देखभाल कार्य सुरू असताना वर्कशॉपमध्ये आवश्यक पाणीपुरवठा नसल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Pimpri ST Depot
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; पालेभाज्यांचे भाव वाढले

वर्कशॉपमध्ये दररोज बसेसची तपासणी आणि दुरुस्तीची कामे केली जातात. ही कामे वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असते. तपासणी, दुरुस्तीनंतरच बस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ होतात. मात्र, स्वच्छतागृह बंद असल्याने कर्मचाऱ्यांना सुमारे 200 ते 300 मीटर अंतर चालत जाऊन चालक-वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहातील स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे कामात खंड पडतो आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही आगार प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pimpri ST Depot
Pimpri Crime: चाकणमध्ये राष्ट्रध्वज जाळल्याप्रकरणी तरुणाला अटक

कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या

  • सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

  • वर्कशॉपमधील स्वच्छतागृह पूर्णपणे बंद

  • 200-300 मीटर अंतर चालत जावे लागते

  • उन्हाळा, पावसाळ्यात अधिक त्रास

  • कामाच्या वेळेत खंड

Pimpri ST Depot
Pimpri Chinchwad Temperature: पिंपरी-चिंचवडमध्ये 40 अंश तापमान; उकाड्याने नागरिक त्रस्त

त्वरित उपाययोजनांची मागणी

कर्मचारी संघटनांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करून वर्कशॉपमधील स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या समस्येमुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अप्रत्यक्षपणे प्रवाशांच्या सेवेलाही फटका बसू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने हस्तक्षेप करुन परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वर्कशॉपमधील स्वच्छतागृह आणि पाण्यासाठी तजवीज करण्यात येत आहे. त्याबाबत कामालादेखील सुरुवात झाली असून, काही दिवसांतच कामे पूर्ण होतील.

पल्लवी पाटील, आगारप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news