Shilpa Gaware Case: शिल्पा गवारे प्रकरणाचा तपास सुरू; लवकरच आरोपपत्र दाखल करणार

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती; हुंड्यासाठी महिलांचा छळ होणे दुर्दैवी, समाजाची मानसिकता बदलण्याचे आवाहन
Shilpa Gaware
Shilpa GawarePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: वाकड येथील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यात अटक केलेल्या सासरच्या मंडळींना अद्याप जामीन मिळालेला नाही, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. मंगळवार (दि. १३) शिल्पा यांच्या माहेरच्या मंडळींची भेट घेतल्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

Shilpa Gaware
Pimpri Chinchwad Unauthorized Construction: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांना चाप; घरखरेदीच्या दस्तनोंदणीवर बंदी

शिल्पा सचिन गवारे यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी वाकड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी त्यांचे भाऊ संतोष कलाटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिल्पा यांचे पती सचिन उत्तम गवारे यांच्यासह सासरच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली.

Shilpa Gaware
Navi Sangvi Drainage Chamber: नवी सांगवीत सिमेंटचा रस्ता पुन्हा खोदणार; ४० फूट खोल ड्रेनेज चेंबर ढासळले

सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, शिल्पा यांची आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कलाटे कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधत हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आश्वासन दिले आहे.

Shilpa Gaware
School Meal Workers Honorarium: विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या महिलांचे मानधन थकले; तीन महिन्यांपासून प्रतीक्षा

या पार्श्वभूमीवर रहाटकर यांनी कलाटे कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. या वेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप, नगरसेविका स्नेहा कलाटे, संतोष कलाटे, रणजित कलाटे उपस्थित होते. पोलिसांकडून प्रकरणातील सर्व बाबींची नोंद घेऊन पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र तयार केले जाईल. कायद्यातील तरतुदी आणि लावण्यात आलेल्या कलमांवर आरोपींच्या जामिनाचा निर्णय अवलंबून असतो, असे रहाटकर यांनी स्पष्ट केले.

Shilpa Gaware
Navratri Fasting Food Prices: नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांना मागणी; रताळे, भुईमूग शेंगांचे दर तेजीत

हुंड्यासाठी त्रास दिला जाणे दुर्दैवी

हुंड्याच्या नावाखाली महिलांचा होणारा छळ ही गंभीर सामाजिक समस्या बनत असल्याबद्दल रहाटकर यांनी चिंता व्यक्त केली. समाज आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जाणे दुर्दैवी आहे. अशा घटना रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नसून समाजाची मानसिकताही बदलण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचारांविरोधात नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news