Navi Sangvi Drainage Chamber: नवी सांगवीत सिमेंटचा रस्ता पुन्हा खोदणार; ४० फूट खोल ड्रेनेज चेंबर ढासळले

ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने दुरुस्तीचे काम आठ दिवस चालण्याची शक्यता; रस्ते आणि भूमिगत वाहिन्यांच्या कामातील समन्वयाचा अभाव उघड
Navi Sangvi Drainage
Navi Sangvi DrainagePudhari
Published on: 
Updated on: 

सांगवी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ३२ मधील नवी सांगवी येथील पेरूच्या बाग परिसरात रस्त्याखाली सुमारे ४० फूट खोल असलेले ड्रेनेज चेंबर ढासळल्याने प्रभाग क्रमांक २९ कडून येणारी ड्रेनेज लाईन पूर्णपणे चोकअप झाली आहे.

Navi Sangvi Drainage
School Meal Workers Honorarium: विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या महिलांचे मानधन थकले; तीन महिन्यांपासून प्रतीक्षा

या समस्येच्या दुरुस्तीसाठी बारा मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता खोदण्याची वेळ आली असून, दुरुस्तीच्या कामासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या भूमिगत वाहिन्यांकडे दुर्लक्ष करून रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Navi Sangvi Drainage
Navratri Fasting Food Prices: नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांना मागणी; रताळे, भुईमूग शेंगांचे दर तेजीत

पिंपळे गुरव येथून नवी सांगवीतील पेरूची बाग मार्गे जुनी सांगवीपर्यंत जाणारी ही ड्रेनेज लाईन सुमारे तीन दशकांपूर्वी टाकण्यात आली होती. ही वाहिनी जमिनीपासून जवळपास ४० फूट खोल असल्याने तिची देखभाल आणि दुरुस्ती करणे आव्हानात्मक ठरत आहे. संबंधित चेंबर ढासळल्याने त्याचा मलबा आत साचला असून, सांडपाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळला आहे. परिणामी, या वाहिनीशी जोडलेल्या पिंपळे गुरव परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Navi Sangvi Drainage
Engineering Student Patents: पेटंट ते प्रॉडक्ट! पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनाला उद्योगांची पसंती

कामामध्ये समन्वयाचा अभाव

रस्ता तयार झाल्यानंतर आता चेंबरच्या दुरुस्तीसाठी तोच रस्ता पुन्हा खोदावा लागत आहे. परिणामी, रस्ते आणि भूमिगत सेवावाहिन्यांच्या कामांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकीकडे रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेने खर्च केला, तर दुसरीकडे आता ड्रेनेज चेंबरच्या दुरुस्तीसाठी तोच रस्ता खोदणे, खोल उत्खनन करणे आणि त्यानंतर पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करणे, असा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. हा संपूर्ण खर्च अखेरीस नागरिकांकडून जमा होणाऱ्या कराच्या पैशांतूनच केला जाणार आहे. त्यामुळे विकासकामे करताना जुन्या पायाभूत सुविधांची तपासणी, संबंधित विभागांमधील समन्वय आणि दूरगामी नियोजन यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. अन्यथा, आज केलेल्या कामावर उद्या पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊन सार्वजनिक निधीचा अपव्यय होत राहण्याची भीती आहे.

Navi Sangvi Drainage
Ravet Waste to Energy Project: मोशीचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद; रावेतमध्ये २७ मेगावॅटचा नवा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

विशेष म्हणजे, ही ड्रेनेज लाईन ड प्रभागाच्या अंतर्गत येत असली, तरी तिचा मार्ग ह प्रभागातून जातो. त्यामुळे दोन्ही प्रभागांमधील समन्वय आणि देखभालीच्या जबाबदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ह प्रभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या वाहिनीकडे वेळेत लक्ष दिले गेले असते, तर चेंबरची दुरवस्था आधीच लक्षात येऊन संभाव्य अडचण टाळता आली असती, अशी चर्चा परिसरात होत आहे. आता चेंबरपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता खोदून तब्बल ४० फूट खोल उत्खनन करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news