Swimming Pool Mohannagar: मोहननगरातील राजश्री शाहू महाराज जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण; नागरिकांसाठी लवकरच खुला होणार

नगरसेवक प्रमोद कुटे यांची पाहणी; उन्हाळ्यापूर्वी तलाव सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
Swimming Pool Mohannagar
Swimming Pool MohannagarPudhari
Published on
Updated on

पिंपरी : मोहननगर, चिंचवड येथील महापालिकेच्या राजश्री शाहू महाराज जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशा सूचना नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांनी क्रीडा विभागाचे अधिकारी, ठेकेदार व एजन्सीला दिल्या आहेत.

Swimming Pool Mohannagar
Electric Vehicle Policy PCMC: महापौरांसह पदाधिकाऱ्यांना पेट्रोल वाहने; PCMCच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणावर प्रश्नचिन्ह

नगरसेवकांनी आज तलावाच्या कामाची पाहणी केली. या वेळी तलावाची दुरुस्ती, स्वच्छता, सुरक्षितता तसेच, पाणी शुद्धीकरण व्यवस्थेबाबत आढावा घेण्यात आला. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व उत्कृष्ट दर्जात पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Swimming Pool Mohannagar
Oxygen Park PCMC: दुर्गादेवी टेकडीवर ‘स्व. गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ची घोषणा; नामांतरावरून पिंपरीत वाद

उन्हाळा सुरू झाला असून, तातडीने तलाव नागरिकांसाठी खुला करावा, असे सांगण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी कामे अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात तलाव सुरू केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news