Pimpri Transgender School: पुण्यात ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी पहिली शाळा; दहावी शिक्षणासाठी ‘इव्हनिंग लर्निंग सेंटर’ सुरू

समाजकल्याण विभाग व मासूम संस्थेचा पुढाकार; भिक्षा व भेदभावातून बाहेर काढून शिक्षण व रोजगाराची नवी संधी
School
SchoolPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: भीक मागणे, टाळ्या वाजवणे, शिव्या खाणे या पलीकडेही आयुष्य आहे. हे सिद्ध करायला ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीची पहिली शाळा पुणे येथे काढण्यात आली आहे. मासूम संस्थेच्या सहकार्याने, हे केंद्र महाराष्ट्रातील अशा प्रकारचे दुसरे केंद्र असून, २०२४ मध्ये मुंबई येथे सुरू झालेल्या पहिल्या एलजीबीटी क्यू प्लस इव्हनिंग लर्निंग सेंटरच्या यशस्वी मॉडेलवर आधारित आहे.

School
Sangvi Bridge Scam: सांगवी पुल रोषणाईत 17 कोटींचा घोटाळा? सुशोभीकरण कामाची चौकशी करण्याची विरोधकांची मागणी

सामाजिक दुर्लक्षित, भेदभाव आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ट्रान्सजेन्डर आणि तृतीयपंथीयांना औपचारिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुणे इव्हनिंग लर्निंग सेंटर राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्था (NIOS) मार्फत विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामुळे त्यांना मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता मिळवून उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींकडे वाटचाल करता येईल. शैक्षणिक अध्यापनाबरोबरच या केंद्रात अध्ययन साहित्य,परीक्षा सहाय्य, जीवन कौशल्य प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाईल.

School
Chinchwad PSI Case: चिंचवड पोलिस PSIवर मद्यधुंद अवस्थेत तपासासाठी गेल्याचा आरोप; वैद्यकीय तपासणी सुरू

पुण्यात LGBTQIA+ समुदायासाठी समर्पित असे पहिले शिक्षण केंद्र म्हणून हा उपक्रम समावेशक शिक्षणातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या ओळखीचा सन्मान करणारे शिक्षणाचे वातावरण तयार करणारा आहे. आर्थिक परिस्थितीमुळे जे ट्रान्सजेंडर शाळा शिकू शकले नाही. उदा. रॅगिंग करणे, शाळेमध्ये चिडविणे यामुळे शिक्षण सोडले असेल. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि भीक मागणाऱ्या हातात पुन्हा पुस्तके आणि पदव्या कशा येतील यासाठी प्रयत्न केला जात आहे.

School
Pimpri Chinchwad BJP Crisis: पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये डॅमेज कंट्रोल; स्थानिक नेत्यांना कोअर कमिटीशिवाय बोलण्यास बंदी

आतापर्यंत समाजाने या व्यक्तींसाठी रुढी परंपरेच्या चौकटी केल्या होत्या. त्यांना भीग मागायला लावणे, किंवा देवाला सोडणे, देहविक्रय करणे यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. कोणी हिजडा, छक्का, बायला असं चिडविल्यावर घरी सांगू शकत नव्हतो. वय लहान असल्यामुळे आम्हाला व्यक्त होता येत नव्हते. त्यामुळे आम्ही शाळा सोडून दिली. जिथं वारंवार अपमान केला तिथं पुन्हा जायची कोणाचीही इच्छा होत नाही, मात्र, यानिमित्त शिक्षणाची पुन्हा संधी मिळाली याचा खूप आनंद आहे, भावना या व्यक्तींच्या आहेत.

School
Call Forwarding Scam: कॉल फॉरवर्डिंगद्वारे सायबर फसवणूक वाढली: नागरिकांना पोलिसांचा इशारा

मी पहिले मुलगी होती आता मी एक ट्रान्सजेंडर मुलगा आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आठवीमधून शिक्षण सोडले. त्यानंतर मी हाऊसकिपिंगची कामे केली. नंतर डेन्टल क्लिनिकमध्ये काम केले. सध्या सुरक्षारक्षकाचे काम करत आहे. गेली २० वर्षे एकटे राहून काम करत आहे. आता मला चांगल्या नोकरीसाठी पुढचे शिक्षण करायचे आहे. त्यामुळे मी या शाळेत प्रवेश घेतला.

आरूष कुसाळकर (ट्रान्सजेंडर)

परिवाराने बाहेर काढणे किंवा इतर कारणामुळे ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे. अशा ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी याठिकाणी दहावीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. समाज कल्याण विभाग आणि मासूम संस्थेच्या माध्यमातून हा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मी समाजकल्याण विभागाच्या वतीने आवाहन करतो की, अशा प्रकारच्या ज्या व्यक्तींचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा.

विशाल लोंढे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण पुणे )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news