Pune Metro Mahacard: पुणे मेट्रोच्या ‘महाकार्ड’ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद; दीड लाखांहून अधिक कार्डचे वितरण

तिकिटांच्या रांगेतून सुटका; प्रवासावर १० टक्के सवलत, डिजिटल कार्डमुळे वेळेचीही बचत
Pune Metro Mahacard
Pune Metro MahacardPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी महामेट्रोच्या वतीने महाकार्ड सुविधा सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तसेच कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या डिजिटल महाकार्ड सुविधेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी, तरुणवर्ग व चाकरमान्यांनी या कार्डला पसंती दिली असून, आतापर्यंत महामेट्रोने दीड लाख डिजिटल कार्डचे वाटप केले आहे.

Pune Metro Mahacard
Folk Maharashtra Program: ‘फोक महाराष्ट्र’मधून उलगडला लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा

पुणे मेट्रोच्या महाकार्डामुळे आधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा तिकीट रांगेतील वेळ वाचून, प्रवास वेगवान, सुलभ आणि सुखद बनला आहे. आजतागायत महामेट्रोने साधारणत: संख्या १ लाख ५८ हजार ६९६ कार्डचे वितरण केले आहे. पुणे मेट्रोचे महाकार्ड खरेदी करण्यासाठी प्रवाशांना सुरक्षा अनामत रक्कम आणि कार्डमधील सुरुवातीचे रिचार्ज बॅलन्स मिळून साधारणपणे १५० ते २०० रुपयांपर्यंत प्रारंभिक खर्च येतो.

Pune Metro Mahacard
YCM Hospital Medicine Shortage: वायसीएम रुग्णालयातील औषध टंचाई अखेर दूर

या कार्डचा वापर करणे सोपे आणि सोयिस्कर आहे. स्थानकावर प्रवेश करताना किंवा संपवून बाहेर पडताना ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटवरील स्कॅनरवर हे कार्ड टॅप करावे लागते. यामुळे दररोज तिकीट काढण्यासाठी किंवा सुट्या पैशांसाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Pune Metro Mahacard
Wanted Accused Search Operation: फरार ‘वॉन्टेड’ आरोपी पोलिसांच्या रडारवर; महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष शोधमोहीम

वेळेची बचत

सर्वसामान्यांना वापरणे सोयीचे होत आहे. या स्मार्ट कार्डच्या नियमित वापरामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. महाकार्डधारकांना प्रत्येक मेट्रो प्रवासाच्या तिकिटावर दहा टक्के सवलतही मेट्रोकडून दिली जात आहे.

Pune Metro Mahacard
Pimpri Heavy Vehicle Parking: पिंपरीत जड वाहनांचा मनमानी पार्किंग; चौक, गल्लीबोळांत ट्रक-टेम्पो, वाहतुकीला अडथळा

रांग हाेणार कमी

राष्ट्रीय सुलभ कार्ड असल्याने एकाच कार्डचा वापर भविष्यात बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही करणे शक्य होणार आहे. रोख पैशांच्या व्यवहारापासून पूर्ण सुटका होऊन सुरक्षित आणि आधुनिक डिजिटल प्रवास अनुभवता येत आहे. यामुळे रांग कमी होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रवाशांचा मेट्रो कार्डला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी, तरुणवर्ग, कामगार, ज्येष्ठ नागरिकांकडून या कार्डला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच डिजिटल प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे एकत्रित विक्रीची संख्या १ लाख ५८ हजार ६९६ पोहचली आहे.

चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news