Folk Maharashtra Program: ‘फोक महाराष्ट्र’मधून उलगडला लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा

संबळ, हलगी, ढोल-ताशांच्या निनादाने चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह दुमदुमले
Folk Program
Folk ProgramPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: फोक महाराष्ट्र या कार्यक्रमाने रसिकांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अनोखी सफर घडवली. संबळाचा घनगंभीर नाद, हलगीचा कडकडाट, घुंगरांचा झंकार आणि लोकगीतांच्या सुरांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह अक्षरशः दुमदुमून गेले.

Folk Program
YCM Hospital Medicine Shortage: वायसीएम रुग्णालयातील औषध टंचाई अखेर दूर

महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील विविध लोककलांचा, लोकसंगीताचा व पारंपरिक वाद्यांचा समृद्ध वारसा उलगडण्यात आला. पारंपरिक गायन, वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील श्रद्धा, परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्तीचे दर्शन घडले. गावोगावच्या जत्रा, उत्सव, धार्मिक सोहळे आणि सामूहिक लोकजीवनातून विकसित झालेल्या कलाप्रकारांनी मराठी समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे कसे योगदान दिले आहे? हे सांगतानाच लोकगीतांचे शब्द, वाद्यांचे सूर आणि नृत्यांचे ठेके यांमधून पिढ्यान्पिढ्या जपला गेलेला हा सांस्कृतिक ठेवा रसिकांसमोर साकार झाला.

Folk Program
Wanted Accused Search Operation: फरार ‘वॉन्टेड’ आरोपी पोलिसांच्या रडारवर; महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष शोधमोहीम

संबळ, ताशा, हलगी, ढोल, ढोलकी, बासरी, हार्मोनियम, टाळ, झांज, घुंगरू, गजढोल, डफ, चंडा आणि शहनाई अशा विविध वाद्यांच्या साथीने लोकसंगीताचा बहुरंगी आविष्कार साकार झाला. प्रत्येक वाद्याचा स्वतंत्र नाद, त्यातून निर्माण होणारी लय आणि समूहवादनातून निर्माण झालेली ऊर्जा यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली.

Folk Program
Pimpri Heavy Vehicle Parking: पिंपरीत जड वाहनांचा मनमानी पार्किंग; चौक, गल्लीबोळांत ट्रक-टेम्पो, वाहतुकीला अडथळा

गीतांमधून स्त्रीच्या विविध भावविश्वाचा सुरेल आविष्कार

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात धरित्रीच्या लेकी हा संगीत कार्यक्रम पार पडला. गायक धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर, योगिता गोडबोले, प्रीती निमकर व अनघा पेंडसे यांनी सादर केलेल्या मराठी गीतांमधून स्त्रीच्या विविध भावविश्वाचा सुरेल आविष्कार रसिकांसमोर उलगडला. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीला वंदन करणार्‍या शांता शेळके लिखित ‘जय शारदे वागीश्वरी’ या गीताने झाली. मराठी गीत-संगीताच्या विविध प्रवाहांचा आणि स्त्रीच्या भावविश्वाचा सुरेल पट उलगडत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शब्दांना स्वरबद्ध केलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’ या स्फूर्तिगीताने झाली.

Folk Program
Pimple Gurav Footpath Encroachment: पिंपळे गुरवमध्ये पदपथावर अतिक्रमण; पार्किंग, कचरापेट्या अन् तरुणांच्या ठिय्यामुळे पादचारी त्रस्त

मंगळवारी होणार कार्यक्रम

  • प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड :

  • सकाळी 10 : कॉर्पोरेट कबुतर एकांकिका

  • दुपारी 12.30 : ऑल दि बेस्ट नाटक

  • सायंकाळी 5.30 : वरवरचे वधूवर नाटक

  • रात्री 9.30 : सूर वेली सांगीतिक प्रवास

नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, नवी सांगवी

  • सकाळी 9 : महापालिका विद्यार्थ्यांसाठी चार्ली - चॅपलिन आणि जादूचा कंठमणी बालनाट्य

  • सायंकाळी 5 : सदाबहार अजय - अतुल हा सांगीतिक कार्यक्रम

  • रात्री 9 : कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कवितांवर आधारित स्वर - शांता कार्यक्रम

आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी

  • सकाळी 8.15 : बालगीतांचा कार्यक्रम

  • सकाळी 9 : ग्रीझीच्या गुहेत चिंटुची धमाल बालनाट्य

  • दुपारी 12 : गंध मराठी कलेचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news