Pune Grand Tour 2027: पुणे ग्रँड टूर २०२७ साठी पिंपरी-चिंचवडमध्ये ११३ कोटींचा खर्च; रस्ते होणार चकाचक

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम २६ ते ३१ जानेवारीदरम्यान; ११३ किलोमीटरच्या मार्गावर डांबरीकरण, सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई
Pune Grand Tour
Pune Grand TourPudhari
Published on: 
Updated on: 

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार शहरवासीयांना नव्या वर्षात पुन्हा अनुभवायास मिळणार आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी पालिकेकडून रस्ते चकाचक करून, आकर्षक व सुशोभिकरण केले जाणार असून, त्यावर 113 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या शर्यतीमुळे उद्योगनगरीचे नाव जागतिक पटलावर चमकणार असल्याने खर्च ही नगण्य असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Grand Tour
Lonavala Murder Accused Arrested: पत्नीच्या खुनानंतर १८ वर्षे फरार; लोणावळा पोलिसांनी परभणीतून आरोपीला पकडले

मागील वेळेस शहरातील नागरिकांनी पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा थरार अनुभवला होता. त्याला शहरवासीयांना मोठा प्रतिसाद झाला. या शर्यतीसाठी शहरातील रस्ते सुशोभित करून चकाचक करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यावेळेस शहरातील एकूण 54 किलोमीटर अंतरावर शर्यत धावली होती. त्यासाठी महापालिकेने एकूण 60 कोटी रुपयांचा खर्च केला होता. या शर्यतीत 35 देशांतील 29 संघ आणि 171 सायकलपटूंनी सहभाग घेतला होता.

Pune Grand Tour
Pimpri Chinchwad Municipal Corporation Anniversary: रक्तदान, रांगोळी अन् रस्सीखेच; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

यंदाच्या दुसर्‍या आवृत्तीतील शर्यत पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरात सहा टप्प्यात होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून दुप्पटीने म्हणजे एकूण 113 किलोमीटर अंतर रस्त्यांवरून धावणार आहे. त्यासाठी त्या मार्गावरील सर्व डांबरीकरण आणि काँक्रीट रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. गतिरोधक काढून रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. आवश्यक तेथे नवीन पदपथ करण्यात येणार आहेत. रस्त्यांवर रोड मार्किंग करण्यात येणार आहे. रस्त्यांवर दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक उभारण्यात येणार आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतींवर आकर्षक रंगकाम केले जाणार आहे. बीआरटी मार्गावरील बॅरिकेट‌्सचही रंगरंगोटी केली जाणार आहे. स्वागत फलकही लावले जाणार असून, विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यावर 113 कोटी रुपये खर्च होणार आहे. हा खर्च गेल्या वेळेच्या खर्चापेक्षा दुप्पट आहे.

ही स्पर्धा शहरात 26 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार आहे. शहराचे नाव या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे जागतिक पातळीवर पोचणार आहे. स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण जगभरात केले जाणार आहे. शहराला नवीन ओळख मिळणार आहे. त्या तुलनेत करण्यात येणारा खर्च अधिक नाही. स्पर्धेनंतर सुविधांचा लाभ शहरातील वाहनचालकच घेणार आहेत. त्यामुळे या खर्चास उधळपट्टी म्हणता येणार नाही, असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

Pune Grand Tour
Pimpri Chinchwad Property Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्ता होणार सील; जप्तीच्या कारवाईची तयारी

टप्पा क्रमांक सहा : पिंपरी-चिंचवड ते बालगंधर्व : जाधववाडी, चिखली, लक्ष्मी चौक, मोशी, मोई फाटा, चिखली, कुदळवाडी, चिखली, स्पाईन रोड उड्डाणपूल, सिल्व्हर वाडी चौक, संविधान चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्रिवेणीनगर, तळवडे, भक्ती-शक्ती उड्डाण पूल, निगडी (भुयारी मार्ग), छत्रपती शिवाजी चौक, प्राधिकरण, निगडी, गणेशनगर, रावेत, मुकाई चौक बसथांबा, किवळे, रावेत चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रावेत, भोंडवे सर्कल, पुनावळे फाटा, डांगे चौक, कस्तुरी चौक, फेज वन, हिंजवडी, हिंजवडी जकात नाका, भुजबळ चौक (उड्डाण पूल), वाकड चौक, वाकड पोलिस ठाणे, डांगे चौक, आदित्य बिर्ला रुग्णालय, बिजलीनगर, थेरगाव, चिंचवडे चौक, चिंचवड गाव, चापेकर चौक उड्डाण पूल), एलप्रो चौक, चिंचवड, दर्शन हॉल, चिंचवड, गांधी पेठ, प्रभात कॉलनी, चापेकर चौक भुयारी मार्ग, साठे कॉलनी, चिंचवड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत, डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लायन्स चौक, निगडी, हुतात्मा चौक, निगडी, संभाजी महाराज चौक, निगडी, म्हाळसाकांत चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, निगडी, स्वामी विवेकानंद चौक, निगडी, छत्रपती शिवाजी चौक, प्राधिकरण, निगडी, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्रिवेणीनगर, तळवडे, सीझन बँक्वेट्स, यमुनानगर कॉर्नर, चिंचवड, बर्ड व्हॅली उद्यान, केएसबी चौक भुयारी मार्ग, टाटा सर्कल, नेहरूनगर, साई चौक, भोसरी, एमआयडीसी, भोसरी, इंद्रायणी चौक, भोसरी, सिद्धिविनायक चौक, भोसरी, पीसीएनटीडीए सर्कल, स्पाईन रोड उड्डाण पूल, सिल्व्हरवाडी चौक, केएसबी चौक उड्डाण पूल, ऑटो क्लस्टर, काळेवाडी रोड, एम्पायर इस्टेट, तापकीर चौक, रहाटणी फाटा, रहाटणी, पिंपळे सौदागर पाणी टाकी, म्हसोबा चौक, पिंपळे गुरव, रामकृष्ण चौक, पिंपळे गुरव, पीसीएमसी पाणी टाकी, पिंपळे गुरव, गोविंद यशदा चौक, मिथिलानगरी, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, रक्षक चौक, राजीव गांधी पूल, औंध.

Pune Grand Tour
Pimpri Chinchwad RTO Action: पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा, दुचाकींचा मालवाहतुकीसाठी वापर; १८ वाहनांवर कारवाई

शहर पुन्हा जागतिक पातळीवर झळकणार

पुणे ग्रँड टूर 2027 ही केवळ सायकल शर्यत नाही. पिंपरी-चिंचवड शहराची आंतरराष्ट्रीय क्षमता दाखवणारी स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाच्या निकषांनुसार शहरातील रस्ते, चौक, पूल व सार्वजनिक जागांची तयारी करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शहराचे सौंदर्य व नियोजन जगासमोर मांडले जाणार आहे. त्या शर्यतील जगभरात थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने पिंपरी-चिंचवड शहराचे नाव जागतिक पातळीवर झळकणार आहे. भविष्यात हे शहर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे केंद्र म्हणून विकसित होण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

टप्पा क्रमांक चार

आळंदी ते लोणावळा : आळंदी, मॅगझिन चौक, लांडेवाडी, टेल्को रोड, कुदळवाडी रोड, मोई फाटा, तळवडे, चाकण फेज तीनच्या दिशेने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news