Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा प्रचार जोरात

लोणावळ्यात पत्रकार परिषद, तळेगाव दाभाडेत प्रचार बैठक; डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी घटक पक्ष सक्रिय
Pune Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा प्रचार लोणावळा शहरामध्ये जोरदार सुरू असून, महायुतीचे सर्व घटक पक्ष या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले आहेत. प्रचाराची माहिती व मतदारांना आवाहन करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने लोणावळा शहरात पत्रकार परिषद घेत दोन्ही उमेदवारांसमोर पसंती क्रमांक एक नोंदवत त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले.

Pune Graduate Constituency Election
Pimpri Chinchwad Dasara: पिंपरी-चिंचवडमध्ये दसऱ्याचा उत्साह; २१८ मिरवणुका, २४ ठिकाणी रावणदहन

नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवी पोटफोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भोईर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमलशील म्हस्के, भाजपचे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी, अरुण लाड, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा भांगरे, नगरसेवक जाकीर खलिफा, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष भारत चिकणे, पराग राणे, माजी उपनगराध्यक्ष मारुती तिकोने, समीर इंगळे, जयप्रकाश परदेशी, विशाल पाठारे, नरेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune Graduate Constituency Election
Pimpri Chinchwad Cyber Fraud: शेअर बाजारातील ८६ लाखांच्या फसवणूक प्रकरणात नऊ आरोपींवर मकोका; कंबोडियातील सूत्रधाराशी धागेदोरे

पत्रकार परिषदेनंतर महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लोणावळा शहरातील शाळांमध्ये भेट देत शिक्षक मतदारांना उमेदवारांचे परिचय पत्रक वाटप केले. तसेच, पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या समोरील पसंती क्रमांक एक नोंदवत त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

महायुतीचे पदाधिकारी सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेत असून, मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करून घेण्याचा आमचा मानस असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष व त्यांचे पदाधिकारी या प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी झाले असून, निश्चितच महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Pune Graduate Constituency Election
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या भाजी मंडईत टोमॅटो, लसूण स्वस्त; ऑक्टोबर हिटमुळे पालेभाज्या महागल्या

महायुती उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी तळेगाव दाभाडे येथे महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीत आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रवींद्र भेगडे, तळेगाव-इंदुरी मंडळाचे अध्यक्ष विनायक भेगडे, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्यासह शहरातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Graduate Constituency Election
Maval Paddy Crop Damage: मावळमध्ये पावसाच्या खंडामुळे भातपिके करपली; आमदार सुनील शेळकेंकडून बांधावर जाऊन पाहणी

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (शिंदे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तसेच मित्रपक्षांच्यावतीने दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मतदारांपर्यंत महायुतीची भूमिका आणि उमेदवारांचे विचार पोहोचवून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या वेळी आमदार सुनील शेळके, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, विनायक भेगडे आणि सुरेश धोत्रे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. मतदारांशी संपर्क वाढविणे, समन्वयाने प्रचाराचे नियोजन करणे आणि दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी संघटितपणे कार्य करणे, असे आवाहन त्यांनी केले. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाऊन डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news