Maval Paddy Crop Damage: मावळमध्ये पावसाच्या खंडामुळे भातपिके करपली; आमदार सुनील शेळकेंकडून बांधावर जाऊन पाहणी

नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश; दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Crop Damage
Crop DamagePudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: पावसाने ओढ दिल्याने मावळ तालुक्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हाताशी आलेले पीक डोळ्यांसमोर करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Crop Damage
Pimpri Flower Market: खंडेनवमी-दसऱ्यासाठी पिंपरीतील फुलबाजार सजला; झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

मावळ तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून, यंदा पावसाअभावी भात पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भाताची पिके तयार होण्याच्या अवस्थेत असतानाच पाण्याअभावी करपली आहेत. त्यामुळे वर्षभर कष्ट करून पिकवलेले पीक हातातून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतीसाठी केलेला खर्च, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आणि सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Crop Damage
Boss Fraud WhatsApp Scam: बॉसच्या व्हॉट्सॲपवरून मेसेज अन् खात्यातून पैसे गायब! ‘सीईओ फ्रॉड’पासून सावध राहा

या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी जागेवरूनच संपर्क साधत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उद्यापासून म्हणजेच १९ ऑक्टोबरपासून भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, हे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांचे अहवाल शासन दरबारी सादर करण्याचे निर्देशही दिले

Crop Damage
Pimpri Chinchwad Garbage Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याचे गणित बिघडले; रोजच्या संकलनात ६०० टनांची तफावत

दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याची मागणी

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी आणि पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी योग्य नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news