Pratiksha Kharat: बर्फाच्छादित पर्वतांवर तिरंगा अभिमानाने उंचावला!

बीएसएफच्या प्रतीक्षा खरात यांची स्पिती व्हॅलीतील १० कि.मी. मॅरेथॉनमध्ये दमदार कामगिरी
Pratiksha Kharat
Pratiksha KharatPudhari
Published on
Updated on

देहूगाव: जिद्द, चिकाटी, धैर्य आणि देशसेवेची भावना मनात असेल तर कोणतेही आव्हान मोठे नसते, याचा प्रत्यय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या पुण्याच्या कन्या प्रतीक्षा संजय खरात यांनी दिला आहे.

हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित आणि अत्यंत खडतर अशा स्पिती व्हॅली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये त्यांनी दमदार कामगिरी करत देशभरातून सतारावा क्रमांक पटकावला.

Pratiksha Kharat
Moshi Garbage Depot: मोशी दुर्घटनेस 55 दिवस उलटूनही कचरा समस्या कायम; सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

स्पिती व्हॅलीतील स्पिती हाय अल्टिट्यूड माउंटन डेजर्ट या उंच पर्वतीय भागात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. अत्यंत थंड वातावरण, विरळ हवामान आणि खडतर पर्वतीय मार्ग अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रतीक्षा खरात यांनी मॅरेथॉन पूर्ण करत देशभरातील टॉप-वीस स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले.

विशेष म्हणजे (बीएसएफ) बटालियन क्रमांक सत्तावीसमध्ये देशाच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना प्रतीक्षा खरात यांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविली आहे. देशसेवेबरोबरच हिमालयातील मॅरेथॉन व ट्रेकिंगच्या माध्यमातून त्यांनी आपल्या क्षमतेचा ठसा उमटविला आहे.

बर्फाच्छादित पर्वतांच्या सान्निध्यात, अत्यंत थंड वातावरणात आणि आव्हानात्मक परिस्थितीत दहा किलोमीटरचे अंतर पूर्ण करणे हीच मोठी धैर्याची बाब आहे. अशा परिस्थितीत देशभरातून सतरावा क्रमांक मिळविणे ही प्रतीक्षा खरात यांच्या मेहनतीला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे.

Pratiksha Kharat
Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीसाठीच्या साहित्याने सजली बाजारपेठ; बालगोपालांच्या पोशाखांना मागणी

प्रतीक्षा खरात यांच्या या यशातून देशातील युवा पिढीला स्पष्ट संदेश मिळतो. “परिस्थिती कितीही कठीण असो, ध्येय निश्चित असेल आणि जिद्द कायम असेल, तर यश निश्चित मिळते.” देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या प्रतीक्षा खरात यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पुण्याच्या मातीतून हिमालयाच्या शिखरापर्यंत!

प्रतीक्षा खरात यांच्या या यशामुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशभरातील स्पर्धकांमध्ये सतरावा क्रमांक आणि पहिल्या वीसमध्ये स्थान मिळविणे ही केवळ क्रीडाक्षेत्रातील कामगिरी नसून, कठीण परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news