Pradhan Mantri Awas Yojana PCMC: पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा; 9 ठिकाणी 6,500 घरे

रावेतपासून होणार सुरुवात; ईडब्ल्यूएस व झोपडपट्टीवासीयांना 484 चौरस फुटांच्या सदनिका मिळणार
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas YojanaPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत एक, रावेत दोन आणि चोविसावाडी येथील नऊ ठिकाणी पालिकेकडून गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांतील साडेसहा हजार कुटुंबांना पक्की घरे (सदनिका) मिळणार आहेत. त्याची सुरुवात रावेत येथील गृहप्रकल्पापासून होणार आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
Ajit Dada Statue Pimpri: भाऊसाहेब भोईरांचा अजितदादा पुतळा व पिंपरीतील नागरी समस्या यावर भाष्य

न्यायालयात वाद गेल्याने तसेच, मुदतीमध्ये जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला. तेथील लाभार्थ्यांना किवळेतील खासगी गृहप्रकल्पात सदनिका देण्यात आल्या. प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की ओढवलेल्या रावेत येथील गृहप्रकल्पाच पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोविसावाडी असे नऊ ठिकाणी पालिकेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेने सुधारित विकास योजना आराखड्यात (डीपी प्लान) या आठ ठिकाणच्या जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी व रावेत या सहा ठिकाणी आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प असणार आहेत.

Pradhan Mantri Awas Yojana
Pimpri Chinchwad Smart City Shutdown: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्प मार्च 2026 मध्ये बंद

तर, उर्वरित रावेत, ताथवडे, चोविसावाडी या ती ठिकाणी एचडीएच गटासाठी (बेघरासाठी घरे) गृहप्रकल्प असणार आहे. रावेत येथे जुना व नवा असे दोन गृहप्रकल्प होणार आहेत. त्या नऊ गृहप्रकल्पांत साडेसहा हजार सदनिका उभारल्या जाणार असल्याचे नऊपैकी रावेत येथील दोन जागा ताब्यात असून, उर्वरित सात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रावेत येथील गृहप्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या गृहप्रकल्पातील घरांसाठी नागरिकांना दोन ते तीन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात उभारली 2 हजार 124 घरे

महापालिकेने पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेत मोशीतील बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, पिंपरीतील उद्यमनगर आणि आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. आर्थिक दृष्ट्‌‍या दुर्बल घटकांतील कुटुंबांना 3 हजार 668 सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या डुडुळगाव येथील गृहप्रकल्पातील 1 हजार 190 सदनिकांची सोडत काढून लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण करण्यात आले.

Pradhan Mantri Awas Yojana
Maval Taluka Psnchayat Samiti Election Result: मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचा ऐतिहासिक विजय; जिल्हा परिषद–पंचायत समितीत १५-० क्लीन स्वीप

484 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका असणार

आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस होय. पंतप्रधान आवास योजनेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील ईडब्ल्यूएस वर्गासाठी पूर्वी तीन लाख रूपये उत्पन्नाची मर्यादा होती. ती आता वाढवून सहा लाख रूपये करण्यात आली आहे. सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका खरेदी करता येतील. तसेच, पूर्वी 30 चौरस मीटर (323 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरिया) सदनिका होत्या. आता, क्षेत्रफळ वाढवल्याने 45 चौरस मीटर (484 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या सदनिका असणार आहेत.

झोपडपट्टीवासीयांना घरे

पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये शहरातील जास्तीतजास्त कुटुंबांना लाभ मिळणार आहे. वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सदनिकाच्या किमान कार्पेट क्षेत्रफळामध्ये वाढ करण्यात आली आहे. या योजनेत शहरातील झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांचाही समावेश केल्याने शहरातील हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
Maval Taluka Election Result: मावळ तालुका ‘कमळमुक्त’; जिल्हा परिषद–पंचायत समितीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

रावेत येथील गृहप्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू

पंतप्रधान आवास योजनेतील टप्पा दोनमधील गृहप्रकल्पातील रावेत येथील जागा ताब्यात आहे. तेथे काम सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची मंजुरी घेण्यात येत आहे. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल. उर्वरित ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्यासाठी नगररचना विभागास कळविले आहे. टीडीआर की नुकसान भरपाई देऊन त्या जागा ताब्यात घेण्याचा त्याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. जागा ताब्यात आल्यानंतर तेथेही काम सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी नियुक्ती

पंतप्रधान आवास योजनेतील टप्पा दोनमध्ये शहरातील 9 ठिकाणी सुमारे साडेसहा हजार सदनिका बांधण्यात नियोजन आहे. त्यासाठी शहरातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. ते कामकाज करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news