Maval Taluka Election Result: मावळ तालुका ‘कमळमुक्त’; जिल्हा परिषद–पंचायत समितीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

आमदार सुनील शेळकेंचा करिष्मा कायम; भाजपचा सर्व जागांवर पराभव
Bjp vs Ncp
Bjp vs NcpPudhari
Published on
Updated on

गणेश विनोदे

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने भाजपचा सुपडासाफ केला आहे. 25 वर्षे सत्तेवर असताना मावळ तालुका घड्याळमुक्त करण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात अवघ्या सहा वर्षांत मावळ तालुका कमळमुक्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यानिमित्ताने मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचा करिष्मा कायम असून, मावळकरांनी अजितदादांना एक प्रकारे श्रद्धांजली समर्पित केले असल्याचे दिसते.

Bjp vs Ncp
Pimpri Chinchwad Board Exam Security: बोर्ड परीक्षांसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

1992 मध्ये पहिल्यांदा भाजपला मिळाली होती सत्ता

काँग््रेासचे वर्चस्व असलेल्या मावळ तालुक्यात सन 1992 मध्ये मावळ पंचायत समितीवर भाजपची चिठ्ठीवर सत्ता आली, त्या वेळी समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठीवर भाजपचे एकनाथ टिळे हे सभापती तर रूपलेखा ढोरे या उपसभापती झाल्या आणि खऱ्या अर्थाने भाजपची यशस्वी वाटचाल सुरू झाली. त्यानंतर सन 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन उपसभापती रूपलेखा ढोरे यांना उमेदवारी देऊन मोठी चाल खेळली. भाजपची ती चाल यशस्वी झाली आणि तत्कालीन मंत्री मदन बाफना यांचा पराभव करत रूपलेखा ढोरे या भाजपच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या.

Bjp vs Ncp
Pimpri Chinchwad HSC Exam: बारावीची परीक्षा सुरू; ३५ केंद्रांवर तयारी पूर्ण

त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी वगळता सन 2002 पासून सन 2022 पर्यंत म्हणजे तब्बल वीस वर्ष मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम राहिली. याकाळात आमदार, पंचायत समिती, लोणावळा, तळेगाव नगर परिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच बहुतांश ग््राामपंचायतवर भाजपची सत्ता होती. त्या वेळी मावळ तालुका घड्याळमुक्त करण्याचा निर्धार भाजपच्या नेत्यांनी केला होता आणि तशा वल्गनाही भाजप नेत्यांनी जाहीररित्या केल्या होत्या; परंतु या पडत्या काळातही पक्ष टिकवून ठेवण्याचे काम काँग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेासच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी त्या वेळी केले होते. त्यामुळे काँग््रेास किंवा राष्ट्रवादीचा एकही सदस्य नाही, अशी वेळ कधीही आली नाही.

Bjp vs Ncp
Illegal Weight Loss Drug: ‘कॅग्रिलिंटाइड’बाबत हाय अलर्ट; झटपट वजन कमी करण्याच्या आमिषाने आरोग्याशी खेळ

नगर परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला घवघवीत यश

दरम्यान, सन 2019 ला आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून भाजपच्या हातातून मावळची सत्ता गेली, त्यानंतर गेल्या सहा वर्षांत ग््राामपंचायत वगळता कुठल्याही निवडणुका झाल्या नव्हत्या. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार शेळके यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आणि लोणावळा नगर परिषदमध्ये एकही नगरसेवक नसताना थेट एक हाती सत्ता काबीज केली. वडगाव नगरपंचायतमध्येही एकहाती सत्ता पुन्हा राखली. तर, तळेगाव दाभाडे नगर परिषदमध्ये महायुती करूनही महायुतीचा नगराध्यक्ष व तब्बल 17 राष्ट्रवादीचे नगरसेवक केले.

Bjp vs Ncp
PCMC Water Crisis: पिंपरी-चिंचवडची तहान वाढतेय; सत्ताधाऱ्यांसमोर पाणीटंचाईचे आव्हान

ताकही फुकून पिले, पण...

आता झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र भाजपने ताकही फुकून पिण्याची भूमिका घेतली आणि डावप्रतिडाव करत मातब्बर उमेदवार देऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने इंदोरी, वराळे व खडकाळा कार्ला गटामध्ये राष्ट्रवादीच्या तालमीत तयार झालेल्या पट्‌‍ट्यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान उभे केले होते; परंतु या निवडणुकीत भाजपचे सगळे प्रयत्न फोल ठरले असून, आमदार शेळके यांचा करिष्मा यशस्वी ठरला आणि भाजपला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही.

सगळीकडे राष्ट्रवादीच

तालुक्यात आमदार राष्ट्रवादीचे, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगरपंचायतमध्ये सत्ता राष्ट्रवादीची, तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये 27 पैकी 17 नगरसेवक राष्ट्रवादीचे, मावळ पंचायत समितीमध्ये सर्व 10 सदस्य राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे सर्व 5 सदस्य राष्ट्रवादीचे अशी स्थिती निर्माण झाली असल्याने सद्यस्थितीत मावळ तालुका कमळमुक्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकंदर पंचवीस वर्ष मावळ तालुका घड्याळमुक्त करण्याचे स्वप्न पाहता पाहता अवघ्या सहा वर्षांत मावळ तालुका कमळमुक्त झाला असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news