Pimpri Crime
व्यावसायिकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हाPudhari

Pimpri Crime: व्यावसायिकाला मारहाण; पाच जणांवर गुन्हा

ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री महाळुंगे एमआयडीसी येथील महिंद्रा कंपनीच्या गेट समोर घडली.
Published on

पिंपरी: हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून त्याचे दुकान तोडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री महाळुंगे एमआयडीसी येथील महिंद्रा कंपनीच्या गेट समोर घडली.

याप्रकरणी सुशेन दादाराव गटकळ (36, रा. निघोजे, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. दत्ता सूर्यवंशी (वय 45), आदित्य सूर्यवंशी (वय 21), प्रतीक सूर्यवंशी (वय 21), एक महिला आणि अल्पवयीन मुलगा या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Pimpri News)

Pimpri Crime
Pimpri Ganeshotsav: दोन दिवसांत चार हजारांवर मूर्तींचे संकलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या अंडा-भुर्जीच्या टपरीवर मित्रांसोबत जेवण करत असताना आरोपी दत्ता याने त्याच्यासोबत काम करणार्‍या आचारीला नेपाळी भाषेत काल नेपाळी सण होता, तरी तू कामावर का आला होतास? मला माझ्या मालकाने काल सुट्टी दिली होती असे फिर्यादीला ऐकू जाईल अशा पद्धतीने विचारण्यास सांगितले.

फिर्यादीने याबाबत विचारले असता आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटापट केली. त्यानंतर आरोपीने घरी जाऊन पत्नी आणि मुलांसोबत परत येऊन फिर्यादीला लोखंडी रॉड आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली.

Pimpri Crime
Pimpri Metro: चला मेट्रोने जाऊ, बाप्पाला पाहू! मानाच्या गणराय दर्शनासाठी मेट्रोला वाढती गर्दी

आरोपीच्या पत्नीने हातात लोखंडी रॉड घेतला होता. आरोपीने लोखंडी पट्टी फेकून मारल्याने ती फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला लागून त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील खुर्च्या आणि टेबल तोडून नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपासकरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news