PMRDA Fire Safety Plan: पीएमआरडीएत १५० कोटींचा अग्नी प्रतिबंधक आराखडा मंजूर

नद्यांचे पुनरुज्जीवन, मलनिस्सारण प्रकल्प आणि नवले पुलावरील सेवारस्त्यासह महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री शिंदे–पवार उपस्थित
PMRDA
PMRDA Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अग्निशमन सेवा शुल्कापोटी 300 कोटी रुपयांचा निधी असून, त्यापैकी 150 कोटींचा उपयोग अग्निप्रतिबंधक आराखड्यानुसार विविध उपाययोजनांसाठी करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय विधानभवनात आयोजित पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. तसेच, नद्यांचे पुनरुज्जीवन करून प्रदूषण रोखावे, नद्यांमधून प्रदूषित पाणी जाणार नाही, याची यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

PMRDA
PCMC River Cyclothon: रिव्हर सायक्लोथॉनसाठी महापालिकेची २० लाखांची मंजुरी; डुडुळगाव रस्ता प्रकल्पालाही वेग

सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अतिरीक्त आयुक्त दीपक सिंगला यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

PMRDA
Digital Question Paper: कॉपीमुक्तीसाठी राज्य मंडळ ॲक्शन मोडवर!

प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिस्सारण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. यामुळे गावांतील समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

या कामांमुळे संबंधित गावांतील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे. प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा तयार करावा, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

PMRDA
Cooperative Sector| मोदी सरकारने सहकाराला खऱ्या अर्थाने बळकटी दिली : देशात २ लाख नव्या बहुद्देशीय सहकारी सेवा संस्थांची स्थापना होणार

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी सेवारस्ता

नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डीडी या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू करावे. यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करावी, प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी बैठकीत सादरीकरण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news