PMPML Online Complaint: पीएमपीएमएल प्रवाशांसाठी मोठी सुविधा; ॲपवरून ऑनलाइन तक्रार नोंदवता येणार

तक्रारीचे स्टेटसही पाहता येणार; डेपो आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर प्रशासनाची थेट नजर
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: प्रवाशांच्या तक्रारींचे जलद आणि पारदर्शक पध्दतीने निवारण करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपी) तक्रार निवारणासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या प्रवाशांची तक्रारींचे प्रामुख्याने मेल, फोनद्वारे निवारण केले जाते. त्यामुळे तक्रारी सोडविण्यासाठी अनेक समस्या जाणवत होत्या. तक्रार निवारणास लागणाऱ्या वेळेबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आपली पीएमपीएमएल ॲपमध्येच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म विकसित केले जात आहे. या प्रणालीचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

PMPML
ST NCMC Smart Card Helpline: एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी हेल्पलाइन सुरू; प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण

नवीन ऑनलाइन प्रणालीमुळे प्रवाशांना मोबाईल किंवा ऑनलाइन माध्यमातून तक्रार नोंदवता येईल. तक्रारीचे स्वरुप आणि संबंधित श्रेणी निवडल्यानतंर ती तक्रार आवश्यक कार्यवाहीसाठी आपोआप संबंधित डेपो किंवा डेपो व्यवस्थापकाकडे पाठवली जाईल. त्यामुळे तक्रार एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवताना होणारा विलंब कमी होणार आहे.

PMPML
Pimpri Chinchwad BJP Employment Mathadi Meet: पिंपरीत भाजपचा आज ‘रोजगार-माथाडी’ मेळावा; रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

सध्याच्या व्यवस्थेत प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वर्गीकरण, संबंधित विभाग निश्चित करणे आणि त्या तक्रारी पुढे पाठवण्याचे बहुतांश काम फाइलद्वारे केले जाते. त्यामुळे काही वेळा तक्रारी संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यास विलंब होत होता. नव्या प्रणालीमध्ये ही प्रकिया ऑनलाइन असल्याने तक्रारीवर कार्यवाही करण्याची जवाबदारी थेट संबंधित अधिकारी किंवा डेपो प्रशासनाकडे निश्चित केली जाणार आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Public Toilets: पिंपरी-चिंचवडमध्ये ३० लाखांवर लोक; सार्वजनिक शौचालयांची संख्या मात्र अपुरी!

आभिप्रायही नोंदवता येणार

ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर तिची सद्यस्थिती प्रवाशांना पाहता येईल. तक्रार कोणत्या विभागाकडे पाठवण्यात आली. तिच्यावर कोणती कार्यवाही झाली आणि ती निकाली काढण्यात आली का, याची माहिती ऑनलाइन उपलब्ध होईल. तक्रारीचे निवारण झाल्यानतंर संबंधित प्रवाशाला पीएमपीच्या कार्यवाहीबाबत आभिप्रायही नोंदवता येणार आहे. यामुळे प्रवाशांना वारंवार कार्यालयाशी संपर्क साधण्याची किंवा तक्रारीबाबत चौकशी करण्याची आवश्यकता कमी होईल. त्याचबरोबर तक्रार निवारण प्राकियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Maitri Clinic: पिंपरी-चिंचवडमधील ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय किशोरवयीन मुलांचा विश्वासाचा आधार

अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर नजर

ऑनलाइन प्रणालीचा फायदा केवळ प्रवाशांना नव्हे, तर पीएमपी प्रशासनालाही होणार आहे. कोणत्या डेपोविषयी, मार्गांवर किंवा सेवेसंदर्भात सर्वाधिक तक्रारी येत आहेत, याची एकत्रित माहिती प्रशासनाला मिळेल. त्यानुसार, संबंधित सेवांमधील त्रुटी शोधून उपाययोजना करता येतील. वारंवार उशिरा धावणाऱ्या बस, फेऱ्या रद्द होणे, बसस्थांब्यावर बस न थांबणे, कर्मचाऱ्यांचे वर्तन, बसची स्वच्छता किंवा इतर सेवांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे विश्लेषण करणेही सोपे होणार आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती तक्रारी प्रलंबित आहेत आणि त्याचे निवारण करण्यासाठी किती वेळ लागला, यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख ठेवता येईल. दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या तक्रारींचे स्वतंत्रपणे नोंद घेता येणार असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे प्रशासनासही शक्य होईल.

आपली पीएमपीएमएल ॲपमध्येच प्रवाशांना पीएमपी सेवेविषयी तक्रारी करता येणार आहेत. याबाबतचे काम सुरू आहे. लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधादेखील सुरू करण्यात येणार आहे

यशवंत हिंगे, वाहतूक व्यवस्थापक, पुणे पीएमपीएमएल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news