PCMC PMPML Metro Feeder Bus: पीसीएमसी मेट्रो ते काळेवाडी फाटा फिडर बस सुरू; 10-20 रुपयांत प्रवास

रहाटणी-काळेवाडी भागांना थेट मेट्रो जोडणी; दर 15-30 मिनिटांनी बस सेवा उपलब्ध
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) यांच्या वतीने पीसीएमसी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटादरम्यान मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा यादरम्यान ही बस धावणार आहे. मेट्रो फिडर बसमार्ग क्र. 31 मुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

PMPML
Pimpri STP Inspection Fine: पिंपरी-चिंचवडमध्ये 12 सोसायट्यांवर कारवाई; एसटीपी न चालवल्याने दंड

विशेष म्हणजे, पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी एकूण 10 मेट्रो स्थानकांवरून 23 मार्गांवर 83 फिडर बससुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होत आहे. या नवीन बस मार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबावस्ती, आणि ज्योतिबानगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रो जोडणी मिळाली आहे. येथील नागरिकांचा आता अवघ्या 10 ते 20 रुपयांत हा प्रवास पूर्ण होणार आहे.

PMPML
Pimpri Property Tax Bill Distribution: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर बिले घरपोच; महिला बचत गटांची जबाबदारी

..अशी असेल वेळ:

सकाळी 6:30 पासून सेवा उपलब्ध. मेट्रो शटल मार्ग क्रमांक 31 (पीसीएमसी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा) ही बस गर्दीच्या वेळी दर 15 मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी दर 30 मिनिटांनी उपलब्ध असेल.

PMPML
Pimpri Illegal Pistol Arrest: पिंपरीत देशी पिस्तूलसह दोघे जेरबंद; अल्पवयीनाकडूनही शस्त्र जप्त

वेळ:

पहिली बस : सकाळी 6:30 वाजता पीसीएमसी मेट्रो स्थानकावरून आणि सकाळी 7 वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल. शेवटची बस : रात्री 9 वाजता पीसीएमसीवरून आणि रात्री 9:30 वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल.

PMPML
Pimpri Chinchwad Budget Delay: पिंपरी-चिंचवड महापालिका बजेट रखडले; 1100 कोटींच्या उपसूचनांवर गोंधळ

बस मार्ग:

ही बससेवा दोन्ही दिशांनी वर्तुळाकार धावणार आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानक- कुंदन हॉटेल, गोकुळ हॉटेल, शगुन चौक, जिजामाता रुग्णालय, लकी बेकरी, विजय नगर, अविनाश मंगल कार्यालय, एम.एम. शाळा, तापकीर नगर, धनगरबाबा काळेवाडी, श्रीनगर आणि रहाटणी फाटा. काळेवाडी फाटा - रहाटणी फाटा, श्रीनगर, तापकीर नगर, एम. एम. शाळा, अविनाश मंगल कार्यालय, लकी बेकरी, जिजामाता रुग्णालय, कराची चौक, लाल मंदिर, भाटनगर आणि मोरवाडी चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news