Pimpri Property Tax Bill Distribution: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर बिले घरपोच; महिला बचत गटांची जबाबदारी

31 मेपर्यंत वितरणाचे लक्ष्य; 600 हून अधिक महिलांचा सहभाग, नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन
Property Tax Bill
Property Tax BillPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर बिलांचे वाटप महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत बिल वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

Property Tax Bill
Pimpri Illegal Pistol Arrest: पिंपरीत देशी पिस्तूलसह दोघे जेरबंद; अल्पवयीनाकडूनही शस्त्र जप्त

वेळेत बिल भरून सकारात्मक प्रतिसाद द्यावा

महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ताकर बिलांचे घरपोच वितरण केल्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होतो. ही मोहीम केवळ कर संकलनापुरती मर्यादित नसून, महिला सक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत वेळेत कर भरावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Property Tax Bill
Pimpri Chinchwad Budget Delay: पिंपरी-चिंचवड महापालिका बजेट रखडले; 1100 कोटींच्या उपसूचनांवर गोंधळ

शहरात 8 लाख मिळकती

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र तसेच, मोकळ्या जागांसह सुमारे 7 लाख 44 हजार 630 नोंदणीकृत मिळकती आहेत. मालमत्ता सर्वेक्षणातून नव्याने सापडलेल्या मिळकतींची नोंदणी सुरू असून, एकूण मिळकतींची संख्या 8 लाखांपर्यंत होण्याची शक्यता आहे. या सर्व मिळकतींच्या मालमत्ताकर बिल वितरणाचे काम महिला बचत गटांमार्फत घरोघरी करण्यासाठी महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळास दिले आहे.

Property Tax Bill
Ramabai Ambedkar Memorial: रमाई आंबेडकर स्मारक उभारणीस 19 कोटी 36 लाख; स्थायी समितीकडून विविध कामांना मान्यता

31 मेपर्यंत बिले वितरण करण्याचे नियोजन

करसंकलन विभागाने सर्व बिले 31 मेपर्यंत वितरण करण्याचे नियोजन केले आहे. थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत जप्तीपूर्वीची नोटीस बिलासोबत दिली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेत कर भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बचत गटांच्या महिलाद्वारे घरोघरी जाऊन मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, करासंदर्भातील माहिती देणे आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे, अशी कामेही केली जाणार आहेत.

Property Tax Bill
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

समाज विकास विभागाकडून टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या सक्षमा प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या 600 हून अधिक महिलांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे. तसेच, सिद्धी ॲपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना घरपोच बिल वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुलभ झाली आहे.

सचिन पवार, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news