

हेमांगी सूर्यवंशी
पिंपरी: पीएमपीची बससेवा ही पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची जीवनवाहिनी असून, सध्या या जीवनवाहिनी सेवेची ढिसाळ नियोजनामुळे दुरवस्था झाली आहे. कधी ब्रेकडाऊन,कधी चार्जिंग डाऊनमुळे गाड्या भर रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत अशा तीन भागात प्रवासी दिली जाते. तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील 380 मार्गांवर पीएमपीकडुन सार्वजनिक वाहतुक सेवा दिली जात असून दिवसभरात पीएमपीच्या १७०० बस विविध मार्गांवर धावतात. महामंडळाच्या सेवेमध्ये स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील अशा दोन्ही गाड्यांमध्ये प्रवासी वाहतुक करण्यात येते. पीएमपीएलच्या एकूण २०४१ गाडया असून त्यामध्ये गाडया या स्वमालकीच्या ६५३, आणि भाडेतत्वावरील १३८८ गाडया आहेत. तसेच ठेकेदारामार्फत सेवा देणाऱ्या बसगाडयामध्ये अपघाताचे प्रमाण जास्त आहे.
अपघाताच्या ११ घटना
पीएमपीच्या बसगाडयांचे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान एकुण ११ अपघात घडले आहेत. प्राणंतिक अपघात ९ , गंभीर जखमी ९ जखमी व्यक्ती १०, किरकोळ जखमी २ एकुण घडलेले अपघात सरासरी २३ आहेत. त्यामुळे पीएमपी प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. a
इलेक्ट्रीक बसचे वेळेपूर्वीच चार्जिंग डाऊन
इलेक्ट्रीक बस एका चार्जिंगमध्ये २३० ते २५० किलोमीटर जाणे अपेक्षित आहे. परंतु या बस चार तासांमध्ये पूर्ण चार्ज होणे गरजेचे आहे. दिवसा या गाड्या केवळ अर्धा तासच चार्जिंग केल्या जातात. त्यामुळे ऐन मार्गावरच या गाड्या बंद पडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच महावितरणचे दिवसा आणि रात्रीचे वीज वापराचे दर हे वेगवेगळे आहे. दिवसा जास्त चार्जिंग लावल्यामुळे अधिक फटका बसतो.
प्रवाशांना नाकीनऊ
वाढते ब्रेकडाऊन, स्क्रॅप बसगाडया त्यासह ठेकेदाराचे संपलेले कॉन्ट्रॅक्ट यामुळे पीएमपी अडचणीत सापडली आहे. पीएमपीच्या वाढत्या समस्यामुळे प्रवाशांना नाकीनऊ आले आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पावसामुळे नियोजन कोलमडले
अनेक वेळा शहरात मुसळधार पावसाचा फटका पीएमपी बससेवेला बसतो. पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते जलमय होतात. त्यामुळे पीएमपीच्या गाडया रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पीएमपीच्या स्वमालकीच्या बसचा अपघात झाल्यास संपुर्ण चौकशी केल्यानतंर बसचालकाला निलंबित केले जाते. ज्या भागात अपघात झाला आहे. त्या भागातील वाहतूक पोलिसांना बोलवुन त्यांच्याकडून प्रबोधन केले जाते. तसेच आमच्याकडून चालकांणा प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक आठवड्यात वाहनचालकांची मिंटीग घेण्यात येते. ज्या भागात अपघाताचे स्पॉट या भागात परिपत्रक लावण्यात आलेले आहे. त्या भागात धिम्य गतीने बस चालिवणे अशा सुचना वाहकांना देण्यात आलेल्या आहेत.
यंशवत हिंगे वाहतूक व्यवस्थापक पुणे