Pimpri Chinchwad RTO: ‘मराठी बोलून दाखवा’; आरटीओच्या तपासणीत ६ अमराठी चालक अनुत्तीर्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये ४९७ रिक्षा, टॅक्सी-कॅब चालकांची तपासणी; मराठी न आल्यास बॅज निलंबनाचा इशारा
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on
Updated on

पिंपरी: राज्यातील प्रवासी वाहनांच्या (रिक्षा, टॅक्सी आणि कॅब) चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार २० ऑगस्ट पासून परिवहन विभागाने (RTO) तपासणी मोहीम सुरू करून मराठी न बोलू शकणाऱ्या चालकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली होती. मात्र, निर्माण झालेला वाद पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी चालकांना शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad SIR Voter List: पिंपरी-चिंचवडमध्ये ६.०८ लाख मतदारांची नावे वगळली; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी, हरकतीसाठी महिनाभराची मुदत

दरम्यान पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने ऑटो रिक्षा, आणि टॅक्सी आणि कॅब चालकांना प्रवशांशी व्यवहारोपयोगी मराठी भाषेत संवाद साधता न आल्याने, त्यांना मराठी भाषा शिकण्याविषयी समज दिली; तसेच मराठी न आल्यास बॅज निलंबितची कारवाई करण्याचा इशारा दिला. आरटीओकडून ४९७ वाहनांची तपासणी कऱण्यात आली. या परीक्षेत ६ अमराठी चालक फेल झाले.

Pimpri Chinchwad RTO
Shankarwadi Underpass Waterlogging: ‘पाणी साचल्यास संपर्क करा’ म्हणणारा फलकच अर्धवट; शंकरवाडी भुयारी मार्गावर संपर्क क्रमांक गायब!

परिवहन विभागाने १२ ऑगस्ट रोजी इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या ऑटो रिक्षा, मोटार कॅबच्या आधिकृत चालकास तसेच संबंधित वाहनाच्या परमीटधारकाच्या मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक केले आहे. तसेच संबंधित चालकांना, परवानाधारकांना मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी १५ ऑगस्टॅची मुदत दिली होती. मात्र ही मुदत आता वर्षभरासाठी वाढविण्यात आली आहे. शहरात आरटीओच्या सात भरारी पथकाकंडून तपासणी केली गेली.

Pimpri Chinchwad RTO
Bharatkesari Omya Bull: भारतकेसरी ‘ओम्या’चा अखेरचा निरोप; बैलगाडा शर्यतीच्या मैदानातील ‘बादशहा’ काळाच्या पडद्याआड!

भय्यानों मराठी बोलून दाखवा

भरारी पथकाच्या कारवाईत अमराठी रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठी भाषेत संवाद साधण्यास सांगण्यात आले. यावेळी काही अमराठी चालकांना संवाद साधता आला नाही. तर काहींनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधला. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांना मराठी शिकण्याविषयी भरारी पथकाकडून सांगण्यात आले.

Pimpri Chinchwad RTO
Dehuroad Illegal Water Connections: देहूरोडमध्ये मुख्य जलवाहिनीवर ‘डल्ला’; एजंटच्या माध्यमातून रातोरात अनधिकृत नळजोड?

परिवहन विभागाकडून निर्देश आल्यानतंर वायुवेग पथकामार्फत तपासणी करण्यात आली. या पथकामार्फत रस्त्यावर अडवून चालकांचा प्रवाशांबरोबर मराठी संवाद साधण्याविषयी सांगितले जात होते. यामध्ये ४९७ वाहनधारक उर्तीण झाले असून ६ चालक अनुत्तीर्ण झाले.

अश्विनी स्वामी, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news