Pimpri Chinchwad BJP Core Committee: भाजपच्या पिंपरी-चिंचवड कोअर कमिटीत फेरबदल; २३ वरून सदस्यसंख्या १४ वर

महापालिका पदाधिकाऱ्यांतील मतभेदांची प्रदेश समितीकडून दखल; सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा समितीत समावेश
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

पिंपरी: भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी -चिंचवड महापालिकेतील पदाधिकार्‍यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव वेळोवेळी दिसून आला आहे. त्याची दखल घेऊन पक्षाच्या प्रदेश समितीने कोअर कमिटीत काही बदल केले आहेत. कमिटी २३ सदस्यावरून १४ जणांची करण्यात आली आहे. त्यात पक्ष नेत्यासह युवा, महिला व इतर पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, महापालिका कामकाजासंदर्भात समितीमध्ये पक्षनेत्याचा समावेश करण्यात आल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दावा केला आहे.

BJP
Pimpri Chinchwad Pollution: पवना, इंद्रायणी, मुळा ‘गटारगंगा’; पिंपरी-चिंचवडमध्ये जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणाचा कहर

शहर पातळीवर पक्षाचे धोरण ठरवणे, संघटनात्मक निर्णय घेणे आणि पक्षांतर्गत शिस्तपालन असे अधिकार कमिटीला आहेत. कोअर कमिटीच्या मान्यतेशिवाय किंवा चर्चेविना पदाधिकारी व नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ नये, असा नियम आहे. महापालिकेचे कामकाज किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेणार्‍या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कमिटीला आहे. पक्षासाठी व संघटनेसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे योगदान पाहूनच त्यांना महत्त्वाची पदे किंवा जबाबदार्‍या देण्याचा अधिकार कमिटीला आहे. त्यामुळे भाजप पक्षात कोअर कमिटीला अधिक महत्व आहे.

BJP
Pimpri Chinchwad RTO: ‘मराठी बोलून दाखवा’; आरटीओच्या तपासणीत ६ अमराठी चालक अनुत्तीर्ण

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामकाजातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील गोंधळामुळे सत्ताधारी भाजपची नाहक बदनामी होत आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्यावरुन विरोधक टीका करत आहेत. त्या प्रकाराची भाजप पक्ष प्रदेश समितीने दखल घेतली आहे. त्यानुसार कोअर कमिटीत काही बदल केल्याची व पदाधिकार्‍यांची कानउघडणी केल्याची चर्चा आहे. प्रदेश समितीनुसार कोअर कमिटीची सदस्यसंख्या 23 वरून 14 करण्यात आली आहे. कमिटी मर्यादित करण्यात आली आहे. शहर संघटनेसाठी कोअर कमिटी आहे. महापालिकेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नियमित कोअर कमिटीसह सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा कमिटीत समावेश करण्यात आला आहे, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

BJP
Pimpri Chinchwad SIR Voter List: पिंपरी-चिंचवडमध्ये ६.०८ लाख मतदारांची नावे वगळली; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी, हरकतीसाठी महिनाभराची मुदत

महापालिका पदाधिकाऱ्यांना सूचना

भाजप प्रदेश समितीने केलेल्या सूचना महापालिका पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे. शहर विकासाबाबत पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून कामकाज करावे. आपल्या वर्तनातून पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका पदाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, महापालिकेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी समितीत पक्षनेत्यांचा सदस्य म्हणून समावेश आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष तथा कोअर कमिटी सदस्य शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

BJP
Shankarwadi Underpass Waterlogging: ‘पाणी साचल्यास संपर्क करा’ म्हणणारा फलकच अर्धवट; शंकरवाडी भुयारी मार्गावर संपर्क क्रमांक गायब!

पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळणार

महापालिकेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीसोबत मी सदस्य म्हणून असणार आहे. त्यात महापालिकेसंदर्भात कामकाजाबाबत चर्चा करून धोरण निश्चित केली जाईल. त्याची महापालिकेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार मी जबाबदारी पार पडणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

कोअर कमिटीमध्ये १४ जण

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कोअर कमिटीत 14 जणांचा समावेश आहे. यामध्ये पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, पक्षाचे प्रभारी भरत पाटील, शहर कार्यकारिणी सरचिटणीस वैशाली खाडये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news