

पिंपरी : देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली. गुरुवार (दि. ६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास देवकरवस्ती, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली.
अजय लक्ष्मण नखाते (23, रा. लक्ष्मी मंदिर, कुरळी, ता. खेड,) याला अटक केली आहे. पोलिस कर्मचारी मारोती जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नखाते याच्या ताब्यातून 25 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तुल, मॅगझीन आणि एक हजार रुपयांचे जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. अधिक तपास भोसरीचे पोलिस उपनिरीक्षक सुहास खाडे तपास करीत आहेत.