

Talegaon Dabhade News
तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात इंद्रायणी कॉलनी येथे राहणाऱ्या 95 वर्षीय वृद्ध महिलेने आयुष्य संपवल्याचे धक्कादायक शनिवारी उघडकीस आली. या घटनेने तळेगावात खळबळ उडालीये.
तळेगाव दाभाडेतील इंद्रायणी कॉलनीतील प्लॉट नं.९४ येथील ऋतूगंध रेसिडेन्सीमध्ये राहत असलेल्या विमलबाई गणपत पंडीत (वय- 95) या वृध्देने गळफास घेवून आत्महत्या केली. विमलबाई हा मूळच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ येथील होत्या. सध्या त्या जावई नंदकिशोर पोतदार यांच्याकडे राहत होत्या.
शनिवारी सकाळी त्या रात्री झोपलेल्या जागेवर दिसल्या नसल्यामुळे बाथरुम आदी ठिकाणी शोधाशोध करण्यात आली. यादरम्यान गॕलरीत बाहेरच्या बाजूने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन करीत आहे.