Lions Point Car Tempo Accident: गोव्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू; लायन्स पॉईंट येथे कार-टेम्पो जोरदार धडक

लोणावळा लायन्स पॉईंट येथे कारने टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेत गोव्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू, टेम्पोचालक जखमी. पोलिस तपास सुरू.
India Road Accident
Road AccidentFile Photo
Published on
Updated on

लोणावळा : लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे शनिवारी (दि. 6) सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास कारने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पोचालकदेखील जखमी झाला आहे.

India Road Accident
Talegaon Woman Death: धक्कादायक! तळेगावात ९५ वर्षीय वृद्धेने जीवन संपवले

दर्शन शंकर सुतार (वय 21) व मयूर वेंगुर्लेकर (वय 24, दोघेही रा. म्हापसा, गोवा) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, टेम्पोचालक भीमा विटेकर (वय 60, रा. वाकसई, मावळ) हे जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जलसा रिसॉर्ट येथून लायन्स पॉईंटकडे भरधाव वेगात निघालेली कार (जीए 03 एएम 0885) समोरून येणार्या टेम्पोला (एमएच 14 जेएल 5525) धडकल्याने कारमधील दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

India Road Accident
Kasarwadi Fugewadi Dapodi Smart City Development Issues: कासारवाडी–फुगेवाडी–दापोडीचा विकास कधी स्मार्ट होणार?

म्हापसा गोवा येथून लोणावळ्यात 14 तरुण तीन कारमधून फिरायला आले होते. गुरुवारी ही सर्वजण लोणावळ्यात आले होते. घुसळखांब येथील एका हॉटेलमध्ये हे तरुण मुक्कामी होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योगेश सुतार व मयूर वेंगुर्लेकर हे दोघेजण स्विफ्ट कारमधून लायन्स पॉईंट येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले व जेमतेम दीड किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला.

India Road Accident
Avsari Leopard: बिबट्या पुन्हा आढळला..वाळके कुटुंबाच्या घरासमोर हालचाल CCTV मध्ये कैद

गोवा येथून आलेले हे सर्व जण गोव्यात टॅक्सी चालवतात. लोणावळ्यात ते फिरायला आले होते. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news