Pimpri Chinchwad Navratri Festival 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्रोत्सवाचा जल्लोष; ५० हून अधिक मैदानांवर दांडिया-गरबाची धूम

देवीच्या मंदिरांत घटस्थापनेची तयारी पूर्ण; वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणीत भव्य गरबा महोत्सव, नऊ रंगांची थीम ठरणार आकर्षण
Garba
GarbaPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: शारदीय नवरात्रोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहर सज्ज झाले आहे. रविवार (दि. ११) पासून पुढील नऊ दिवस शहर भक्तीच्या रंगात आणि रात्री दांडियाच्या जल्लोषात रंगून जाणार आहे.

Garba
Pimpri Chinchwad Flower Market: नवरात्रोत्सवामुळे फुलबाजारात तेजी; झेंडूच्या फुलांना मागणी, तिळाच्या फुलांचीही आवक

शहरातील देवीच्या प्रमुख मंदिरांमध्ये घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिर, पिंपरीतील वैष्णोदेवी माता मंदिर, चिंचवडमधील कालिका माता मंदिर आणि निगडीतील दुर्गा देवी मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये रोज सकाळी अभिषेक, होमहवन आणि संध्याकाळी आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Garba
Pimple Gurav Traffic Congestion: पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकातील कोंडी फोडण्यासाठी बॅरिकेट्स; लेन सिस्टीम सुरू

दुसरीकडे तरुणाईसाठी नवरात्र म्हणजे दांडियाचा उत्सव. शहरातील ५० हून अधिक मैदानांवर गरबा-दांडियासाठी मंडप उभारले गेले आहेत. वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी येथे मोठ्या गरबा महोत्सवांची तिकीट विक्री सुरू झाली आहे. नऊ दिवस, नऊ रंगांची थीम यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.

Garba
Pune Inner Ring Road Land Acquisition: पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग; मुळशी, हवेलीत जमीन मोजणीच्या तारखा निश्चित

नवरात्र म्हटले की, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शहर परिसरात दांडिया, रास, गरबाचे सराव अंतिम टप्प्यात आले आहेत. आता घटस्थापनेपासून दांडियाच्या तालावर नृत्य करण्यास तरुणाई तयार झाली आहे.

शहरामध्ये जवळपास एक महिना गरबा आणि दांडियाच्या प्रशिक्षणाचे क्लास सुरू होते. हौसेला मौल नाही याप्रमाणे यामध्ये अगदी लहान मुलींपासून ते मध्यमवयीनदेखील व्यक्तींचादेखील सहभाग होता. आता सरावाचे दिवस संपले असून उद्यापासून दांडियाचा प्रत्यक्ष आनंद लुटण्याची उत्सुकता लागली आहे.

Garba
PMPML Electric Bus Battery Problem: पीएमपीच्या ई-बसची बॅटरी लवकर डिस्चार्ज; प्रवाशांना रस्त्यात उतरावे लागते

धार्मिकता, पावित्र्य आणि व्रतवैकल्याच्या नवरात्री दांडिया-गरब्यामुळे आनंदोत्सवात न्हावून जाणार आहे. तरुणाईच्या जल्लोषाचं वैशिष्ट्य इव्हेण्ट्स, स्पॉन्सर्स, भरघोस बक्षिसे अशा कितीतरी गोष्टी. अवघ्या तरुणाईला साद घालणारा हा उत्सव आता भरात आलाय. त्यात कॉलेज गोईंग मुलामुलींची शनिवार व रविवारसाठी चाललेली जय्यत तयारी तर विचारायलाच नको.

शहरासह उपनगरांतील चौक न चौक आणि कितीतरी लॉन्समध्ये दांडिया-गरबा, ऑर्केस्ट्रा डीजे सिस्टम्स, रंगबिरंगी रोषणाई, त्याला साजेसं फ्लोअरिंग, भव्य व्यासपीठ अशा दिमाखदार आयोजनामुळे तरुणाईचा उत्साहदेखील चांगलाच दुणावलाय. एकंदरीत, भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा संगम असलेले हे नऊ दिवस पिंपरी-चिंचवडकर मोठ्या जल्लोषात साजरे करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news