

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. २२) कोथिंबीर आणि मिरचीचे दर मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. कोथिंबीर २५ रुपयांवरून १० रुपये जुडी दराने विक्री केली जात आहे. हिरवी मिरची ५०-६० रुपयांवरून ३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मटारचाही हंगाम सुरू झाला असून, ६० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. गाजर ६० रुपये किलो दराने मिळत आहे.
पालेभाज्यांमध्ये चंदन बटवा आणि मोहरीच्या पानाची भाजी बाजारात विक्रीस आली आहे. दोन्ही भाज्या २० रुपये जुडी दराने विकल्या जात आहेत. लिंबाची आवक वाढल्याने लिंबू ५० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांद्याचे दर तेजीतच असून ५०-६० रुपये किलो असा दर आहे. लसूण १२०-१८० रुपये किलो, आले १००-१५० रुपये किलो दर आहे. इतर सर्व फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
पिंपरी बाजारातील दर
गवार ६० रुपये किलो, गावरान गवार १०० रुपये किलो, शेवगा ८० रुपये किलो, मटार ६० रुपये, टोमॅटो २० रुपये, भेंडी ५० रुपये किलो, फ्लॉवर ३० रुपये, कोबी २० रुपये, मिरची ३० रुपये, गाजर ६० रुपये, शिमला ५० रुपये, लसूण २०० रुपये, आले १५० रुपये, वांगी ५० रुपये, काकडी २५ रुपये, कारले ४०, कांदे ५०-६० किलो, बटाटा २५-३० रुपये किलो, बिन्स ६० रुपये किलो, पावटा १००, लाल भोपळा २० रुपये, घोसाळी ३०, दोडका ५० रुपये, तोंडली ४० रुपये, बीट ३० रुपये, दुधी ४०.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा ५० रुपये, मटार ८०, गावरान गवार ८० रुपये किलो, गवार ६० रुपये, पावटा १२० तोंडली ६० रुपये, बीट ५०, दोडका ६०, कारली ६०, भरताची वांगी ४०, भेंडी ६० रुपये, मिरची ४०, फ्लॉवर ४०, कोबी ३०, वांगी ५०, घोसाळे ४०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३०, पापडी ८० परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ६० रुपये, सिमला ६० रुपये, राजमा १०० बिन्स ७०, गाजर ६० रुपये किलो, रताळी ५० रुपये, टोमॅटो २५ रुपये.
पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर १० रुपये, मेथी २० रुपये, पालक २० रुपये, शेपू २० रुपये, राजगिरा २०, पुदिना १५ रुपये, मुळा २५ रुपये, चवळई १५, लाल माठ ३०, करडई १५ कांदापात २० रुपये, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २० रुपये, अंबाडी २०, चंदन बटवा २० रुपये जुडी, मोहरीच्या पानाची भाजी २० रुपये जुडी.
मोशी उपबाजारातील घाऊक दर
कांदा ४०, बटाटा १५, लसूण ८५, आले ४०, भेंडी ३५, गवार ६०, टोमॅटो १२, वाटाणा ४५, घेवडा ६०, दोडका ५०, हिरवी मिरची २५, दुधी भोपळा १५, काकडी २०, कारली २५, गाजर २५, फ्लॉवर २०, कोबी १५, ढोबळी ४०, वांगी २५, शेवगा ५०, घोसाळी २५, लिंबू ५५, मका कणीस १५ रुपये प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील आवक
फळभाजी एकूण आवक 4950 क्विंटल, पालेभाजी एकूण आवक 51500 गड्डी, फळे एकूण आवक 743 क्विंटल.
फळभाजी आवक
कांदा ५२४, बटाटा १५३४, लसूण २५, आले १००, भेंडी ९०, गवार १४, टोमॅटो ६१४, वाटाणा १५५, घेवडा ५४, दोडका ७, हिरवी मिरची १३१, दुधी भोपळा ३०, काकडी १५७, कारली १५, डांगर ५२, गाजर १३, फ्लॉवर ४२४, कोबी ४०४, वांगी १८२, ढोबळी ५३, बीट ८, शेवगा ४५, लिंबू २८, मका कणीस ६३ तोंडली १२, रताळी ४ क्विंटल आवक झाली आहे.