Dehu Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीला देहूनगरीत भक्तीचा महापूर; हजारो भाविकांनी घेतले तुकाराम महाराजांचे दर्शन

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने देहू दुमदुमले; मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, भाविकांना खिचडीचे वाटप
Dehu Kartiki Ekadashi
Dehu Kartiki EkadashiPudhari
Published on: 
Updated on: 

देहूगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी श्रीक्षेत्र देहूगाव येथे गर्दी केली होती. पहाटेपासूनच देहूनगरीत भाविकांचा ओघ सुरू होता. इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून भाविकांनी मुख्य मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तासनतास रांगेत उभे राहून जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसेच विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

Dehu Kartiki Ekadashi
MITRA Mentoring Initiative: पिंपरी-चिंचवडमधील शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर मेंटॉर होण्याची संधी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. राम-लक्ष्मण-सीता, विठ्ठल-रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींसह मंदिरातील गाभाऱ्याची रंगीबेरंगी फुले व पानांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत होते.

Dehu Kartiki Ekadashi
Pink E Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षा योजनेचा उद्देश हरवला; महिलांच्या नावावर रिक्षा, स्टिअरिंग पुरुषांच्या हाती

''ज्ञानोबा माऊली तुकाराम'' अशा जयघोषाने देहूनगरी दुमदुमून गेली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जागर सुरू असल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वैकुंठस्थान मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तेथे पवित्र नांदुरकी वृक्षाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.

Dehu Kartiki Ekadashi
Pimpri Chinchwad Fancy Number: पिंपरी-चिंचवडमध्ये फॅन्सी नंबरची क्रेझ; साडेसात महिन्यांत आरटीओला २९.३९ कोटींचा महसूल

भाविकांना खिचडीचे वाटप

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात, तर संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने देहू नगरपंचायतीसमोर वारकरी व भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अन्नदानाच्या माध्यमातून सेवा देण्यात आली.

Dehu Kartiki Ekadashi
FDA Action: लोणावळ्यातील चार नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; अन्न परवाने निलंबित

पोलिस बंदोबस्त, जादा बसची सुविधा

यात्रेनिमित्त देहूरोड पोलिस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसर व प्रमुख मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने जादा बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. भाविकांची वाहतूक व दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक दक्षता घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.