

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 17) बाजारात गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते. फक्त बिन्स आणि वाटाण्याच्या दरात वाढ झाली आहे. वाटाणा आणि बिन्स आवक कमी असल्याने दरवाढ झाली आहे.
पालेभाज्यांच्या दरात किंचित घट झाली होती. कोथिंबीर व मेथीची जुडी 30 रुपये दराने होती. गवार आणि शेवगा आता 50-60 रुपये किलो दराने उपलब्ध होते. वांगी, फ्लॉवर 40-50 रुपये किलो दराने होते. मिरची 50 रुपये, कर्नाटक कैरी बाजारात 50-60 रुपये किलो होती. कांदे 100 रुपये 5 किलो होते. लसूण 100- 150 रुपये तर आले 80-90 रुपये किलो दराने उपलब्ध होते.
फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)
रविवारी बाजारात गवार 70, शेवगा 60, टोमॅटो 25, भेंडी 60, फ्लॉवर 30, कोबी 25, मिरची 50, गाजर 25, शिमला 60, लसूण 100-120, आले 70, वांगी 40, काकडी 40, कारले 70, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 160, पावटा 80, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 50, दुधी 40, घेवडा 60.
पिंपरी बाजारातील दर
पाले भाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30 रुपये, पालक 30 रुपये, शेपू 25 रुपये, राजगिरा 25, पुदिना 10 रुपये, मुळा 30 रुपये, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 30 रुपये, करडई 15, आळू पाने 15 रुपये जुडी, आंबट चुका 30 रुपये, गवती चहा 10.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा 80 रुपये, गवार 60 - 80 रुपये, वाटाणा 120 - 150, पावटा 90, तोंडली 80 रुपये, बीट 50 - 60, दोडका 60 - 80, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 70 रुपये, मिरची 60 - 80, फ्लॉवर 60, कोबी 40 , वांगी 50, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, सुरण 80 - 100रुपये, मद्रास काकडी 40 रुपये, आरबी 50 रुपये किलो, सिमला 80 - 100 रुपये, राजमा 80, बिन्स 80 रुपये, गाजर 50 - 60 रुपये किलो, आरवी 70 - 80, रताळी 60- 80 रुपये, टोमॅटो 30 - 40 रुपये, काकडी 50 रुपये किलो. बिन्स 160 रुपये,
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 7, बटाटा 12, लसूण 70, आले 35, भेंडी 20, गवार 40, टोमॅटो 25, वाटाणा 70, घेवडा 100, दोडका 35, हिरवी मिरची 45, दुधी भोपळा 30, काकडी 25, कारली 35, गाजर 30, फ्लॉवर 25, कोबी 20, वांगी 25, बीट 25, शेवगा 45, घोसाळी 40, लिंबू 90, मका कणीस 50 रू प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 4646, पालेभाजी 39700 (गड्डी), फळे आवक 804, कांदा 580, बटाटा 1534, आले 52, लसूण 68, भेंडी 132, गवार 43, टोमॅटो 546, वाटाणा 14, घेवडा 28, दोडका 16, हिरवी मिरची 146, दुधी भोपळा 78, काकडी 168, कारली 12, डांगर 40, गाजर 97, फ्लॉवर 273, कोबी 199, वांगी 159, ढोबळी 55, बीट 7, शेवगा 99, लिंबू 75, मका कणीस 40, तोंडली 0, रताळी 7 क्विंटल अशी आवक झाली.
लिची आणि फणसाची आवक
उन्हाळा सुरू होताच विविध हंगामी फळांची रेलचेल वाढली असून, सध्या लिची फळाचे बाजारात आगमन झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात सध्या लिचीचा दर सुमारे 70-80 रुपये पाव किलोपर्यंत पोहोचला असूनही ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येत आहे. तसेच, बाजारात आंब्याबरोबर फणसाचाही घमघमाट सुटला आहे. रस्त्याच्याकडेला गाड्यांवर 80 रुपये पाव किलोपर्यंत फणसाचे गरे मिळत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांत मे ते जून दरम्यान लिची आणि फणसाची आवक व्हायला लागते. सुरुवातील भाव चढे असतात. एकदा का पाऊस पडला कि भाव कमी व्हायला सुरुवात होते असे विक्रेते सांगतात. बाजारपेठेत लिची या रसाळ आणि गोड फळाने धूम माजवली आहे. आकर्षक लालसर साल आणि आतल्या पांढऱ्या, सुगंधी गरामुळे हे फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाग दर असूनही चव आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे लिचीला चांगली मागणी मिळत आहे. मूळतः चीनमधील हे फळ भारतात बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. सध्या या बिहार राज्यांतून येणाऱ्या लिचीची बाजारात मोठी आवक होत आहे. आरोग्यदृष्ट्या लिची अत्यंत उपयुक्त मानली जाते. तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचेही गुणधर्म या फळात आहेत. उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, जांभुळ, करवंदे ही फळे खाण्याबरोबरच फणसाची गोडी चाखण्याकडे नागरिकांचा कल आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात फणस विक्रीस येतात. यामध्ये कापा फणसाला अधिक मागणी असते.