Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत पावसाचा परिणाम; पालेभाज्या महागल्या, कोथिंबीरच्या जुडीला ५० रुपयांपर्यंत भाव

आवक घटल्याने गवार, शेवगा, फ्लॉवरसह अनेक भाज्यांचे दर वाढले; पिंपरी फळ बाजारात पेरूची मोठी आवक
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. १९) पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत. कोथिंबीरची जुडी ४० - ५० रुपये दराने विक्री केली जात आहे. तर गवार व शेवगा ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Moshi RTO Testing Center: मोशी आरटीओच्या ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटरमध्ये १५ दिवसांत ८४ वाहनांची तपासणी; तब्बल ७४ वाहने फेल

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे:

रविवारी बाजारात गवार ५० रुपये किलो, शेवगा ५० रुपये, टोमॅटो ३०, भेंडी ५०, फ्लॉवर ७०, कोबी ४०, मिरची ६०, गाजर ४०, शिमला ७०, लसूण १८० - २०० रुपये किलो. आले १२० - १४०, वांगी ५०, काकडी २५, कारले ६० , कांदे २५ - ३० रुपये प्रति किलो, बटाटा २५ - ३०, बिन्स १००, पावटा ९०, लाल भोपळा ४०, घोसाळी ५०, दोडका ६०, तोंडली ७०, बीट ४०, दुधी ३०, घेवडा १०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Cyber Fraud: पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट बँक खात्यांचा वापर करून लाखोंची फसवणूक; तीन गुन्ह्यांत २२ लाखांहून अधिक रक्कम लंपास

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर ४० - ५० रुपये, मेथी ३५ रुपये, पालक 3०, शेपू ३०, राजगिरा २०, पुदिना २५, मुळा १५, चवळई २०, लाल माठ २०, करडई २०, कांदापात ३०, करडई २०, आळू पाने २० रुपये जुडी, चुका २० रुपये.

फळभाज्यांचे: किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ७० रुपये, गवार ६० रुपये, वाटाणा १६० - १८०, पावटा ८० - १००, तोंडली ७० - ८०, बीट ४० - ५०, दोडका ६० - ७०, कारली ५० - ६०, भरताची वांगी ६० - ७०, भेंडी ६० -७०, मिरची ६० - ७०, फ्लॉवर ८०, कोबी ५०, वांगी ५०, घोसाळे ५० - ६०, पडवळ ९०, दुधी भोपळा ३० - ४० , पापडी १००, पावटा १००, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ३०, आरबी ८० रुपये किलो, सिमला ८०, राजमा १०० - १३०, बिन्स ८० - १००, गाजर ४० - ५० रुपये, रताळी ५०, तर टोमॅटो ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Maval Black Crab: पावसाळा आला अन् मावळ-मुळशीत काळ्या खेकड्यांची ‘जत्रा’; खवय्यांची गर्दी, कातकरी बांधवांना रोजगार

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा १४, बटाटा १०, लसूण ९०, आले ७० , भेंडी ३०, गवार ५०, टोमॅटो १५, वाटाणा १२०, घेवडा ६५, दोडका ३५, हिरवी मिरची ३०, दुधी भोपळा ३०, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर ३५, कोबी १५, ढोबळी ४०, वांगी २०, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू ३०, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दर आहेत.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४९०७, पालेभाजी ३७००० (गड्डी), फळे आवक ६९०, कांदा ५८४ , बटाटा १२४०, लसूण ३०, आले ५२, , भेंडी १८५, गवार ३७, टोमॅटो ५७४, वाटाणा १०, घेवडा ४२, दोडका ६१, हिरवी मिरची १४१, दुधी भोपळा ११०, काकडी ३१५, कारली ५८, डांगर ५०, गाजर १०२, फ्लॉवर २८९, कोबी २८४, वांगी १२१, ढोबळी ९३, बीट ११, शेवगा ७५, लिंबू ३४, मका कणीस ३०३, तोंडली ११, रताळी १० क्विंटल इतकी आवक

Vegetable
Pimpri Chinchwad Drain Encroachment: पिंपरी-चिंचवडमध्ये ३५० नाल्यांवरील अतिक्रमणे हटणार; नाले बुजवणाऱ्यांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

पेरूची आवक अन् मागणीही

पिंपरी फळ बाजारात पेरुची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. तसेच पावसाळा असल्याने सफरचंद आणि संत्री, मोसंबी यांना देखील मागणी वाढली आहे. बाजरात पेरू १०० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. डाळिंब देखील २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे :

सफरचंद २५० - ३०० रुपये, मोसंबी १५० - २००, संत्री २००, डाळिंब २५० - ३००, पेरू १०० रुपये, अंजीर १००, पपई ५० - ६०, केळी ५० - ६०, खरबूज ५०, अननस १२० रुपये प्रतिनग, पिअर २६०, ड्रॅगनफ्रुट २००, स्ट्रॉबेरी १०० रुपये, किवी १२० - १३०, चिकू ८० - १०० रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news