Moshi RTO Testing Center: मोशी आरटीओच्या ऑटोमॅटिक टेस्टिंग सेंटरमध्ये १५ दिवसांत ८४ वाहनांची तपासणी; तब्बल ७४ वाहने फेल

स्वयंचलित यंत्रणेमुळे सहा मिनिटांत फिटनेस चाचणी; तांत्रिक त्रुटींमुळे जुन्या वाहनांना मोठा फटका
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मोशी येथील दहा एकर जागेत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) स्वयचंलित चाचणी केंद्र (ऑटोमॅटीक टेस्टिंग सेंटर) उभारण्यात आले आहे. एक मार्चपासून ते कार्यन्वित झाल्यानतंर, एक जुलैपासून ते सुरु करण्यात आले आहे. जुन्या वाहनांच्या सर्व तपासण्या (पासिंग) स्वयंचलित यंत्रांद्रारे केवळ सहा मिनिटांत होणार आहे. मागील पंधरा दिवसांत एकूण ८४ वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आहे. यामध्ये ७४ वाहने फेल असल्याची माहिती आरटीओ प्रशसनाकडून मिळाली आहे.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Cyber Fraud: पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट बँक खात्यांचा वापर करून लाखोंची फसवणूक; तीन गुन्ह्यांत २२ लाखांहून अधिक रक्कम लंपास

पिंपरी-चिंचवड स्वयंचलित चाचणी केद्रांची जून २०२४ मध्ये निविदा प्रकिया राबविल्यानतंर मोशी येथे ११ हजार चौरस फुटांचे चाचणी केंद उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांना आता स्वयंचलित यंत्राच्या माध्यामातून योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफेकेट) देण्यात येणार आहे. एक जूलैपासून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रवासी आणि मालवाहतूक वाहन स्वयंचलित ट्रॅकवर गेल्यावर हेडलाईट, स्पीडो मीटर टेस्टर, अलायनर, कारसाठी सस्पेंशन टेस्टर, रोलर ब्रेक टेस्टर, स्टेरिंग प्ले, गिअर, स्पीड गव्हर्नर तसेच प्रवासी वाहनांचे व्हीएलटीडी अशा विविध प्रकारची चाचणी केली जात आहे.

Pimpri Chinchwad RTO
Maval Black Crab: पावसाळा आला अन् मावळ-मुळशीत काळ्या खेकड्यांची ‘जत्रा’; खवय्यांची गर्दी, कातकरी बांधवांना रोजगार

नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र सुरु झाल्यानतंर स्वयंचलित यंत्राद्रारे सहा मिनिटांत तपासणी होणार आहे. वाहन योग्यता तपासणी क्षमता ३०० इतकी होणार आहे, असा दावा आरटीओ प्रशासनाने केला. मात्र नोंदणीच कमी असल्यामुळे १५ दिवसांत ८४ वाहनांची आणि दिवसाला सरासरी सहा वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Drain Encroachment: पिंपरी-चिंचवडमध्ये ३५० नाल्यांवरील अतिक्रमणे हटणार; नाले बुजवणाऱ्यांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

असे दिले जाते योग्यता प्रमाणपत्र

एक ते १४ जुलैच्या कालावधीत एकूण ८४ वाहनांची फिटनेस तापसणी स्वयंचलीत चाचणी केद्रांवर करण्यात आली. यापैकी केवळ १० वाहनेच फिटनेस तपासणीत पास झाले. असून ७४ वाहने अनफिट ठरली आहेत. वाहनांची तापसणी पूर्ण झाल्यानतंर वाहनांना स्वयंचलित यंत्रांच्या माध्यामातून योग्यता प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र अनफिट ठरलेल्या वाहनांमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे या वाहनांना फेल ठरविण्यात आले आहे. परिवहन संवर्गातील वाहनांची पहिली आठ वर्षे योग्यता तपासणी प्रत्येकी दोन वर्षांनी करण्यात येते. आठ वर्षांनतर ही तपासणी दरवर्षी करण्यात येते. ती केल्यानतंरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. तसेच पूर्वी वाहनांची तपासणी मनुष्यबळावर आधारित होती. निरीक्षक वाहनांचे ब्रेक, दिवे तपासून, सुमारे २५० ते ४०० मीटर अंतरावर वाहन चालवून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Voter List Update: मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ; पिंपरी-चिंचवडमध्ये एसआयआर मोहिमेला वेग

पूर्वी वाहनांची तपासणी मनुष्यबळावर आधारित होती. आता ती स्वयंचलित यंत्रादवारे केली जाते. त्यामुळे तपासणीदरम्यान थोडया त्रुटी आढळल्या तरी ती वाहन फेल ठरते.

राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन आधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news