Pimpri Chinchwad Drain Encroachment: पिंपरी-चिंचवडमध्ये ३५० नाल्यांवरील अतिक्रमणे हटणार; नाले बुजवणाऱ्यांवर महापालिकेचा कारवाईचा बडगा

पहिल्याच पावसात तुंबलेल्या नाल्यांनंतर प्रशासन सतर्क; बांधकामांमुळे अडलेले नैसर्गिक प्रवाह पुन्हा खुले करण्याचा निर्णय
Pimpri Chinchwad Drain Encroachment
Pimpri Chinchwad Drain EncroachmentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: यंदा पहिल्याच पावसामध्ये जुलैच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहरातील नाले तुंबले होते. त्यामुळे नाले अरुंद करणार्‍यांवर तसेच, बुजवणार्‍यांवर महापालिकेच्या वतीने धडक कारवाई केली जाणार आहे. शहरातील साडेतीनशेवर नाल्यांचा प्रवाह खुला केला जाणार आहे.

Pimpri Chinchwad Drain Encroachment
Pimpri Chinchwad Voter List Update: मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ; पिंपरी-चिंचवडमध्ये एसआयआर मोहिमेला वेग

मुसळधार पावसामुळे मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारत कोसळून झालेल्या दुुर्घटनेत नऊ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले. त्याचदरम्यान या पावसामध्ये शहर परिसरातील पावसाळी गटारे, अनेक ठिकाणी नाले तुंबले होते. पवना आणि इंद्रायणी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या परिसरामध्ये सांडपाणी आणि पावसाळी गटारे वाहून जाणार्‍या वाहिन्यांमध्ये पाणी घुसले होते. हे पाणी नागरी भागामध्ये शिरले.

Pimpri Chinchwad Drain Encroachment
Lonavala Rain Tourism: लोणावळ्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग; पर्यटकांची गर्दी, मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडी

मोठ्या गृहप्रकल्पात नाले गायब

गावांचे रूपांतर उपनगरात आणि उपनगरांचे रूपांतर आता स्मार्ट सिटीत झाले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या तीरांवर शहर वसले आहे. त्यामुळे उपनगरातील पाणी नद्यांकडे वाहून जाते. नैसर्गिक प्रवाह निर्माण होऊन नाले तयार झाले. शहरीकरणामध्ये यामधील अनेक नाले बांधकाम व्यवसायिकांनी गायब केले आहेत. त्या ठिकाणी टोलेजंग गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी नाले अरुंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी त्यावर बांधकामे कण्यात आली आहेत.

Pimpri Chinchwad Drain Encroachment
Pimpri Chinchwad PCOS Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांच्या आरोग्याचा इशारा! ४० टक्के महिला-तरुणी पीसीओएसच्या विळख्यात

सर्वेक्षणानंतर शोध सुरू

अनेक ठिकाणी नाल्याच्या प्रवाहात अडथळा येत असल्याने ते तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये शहरातील सुमारे साडेतीनशे ठिकाणे आढळून आली आहेत. काही ठिकाणी नाल्यांवर बांधकामे आहेत. काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह अरुंद केला आहे. तर, काही ठिकाणी भूमिगत पाईप टाकून नाले बुजवण्यात आले आहेत. अशा ठिकाणांवर आता कारवाई केली जाणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठस्तरावर बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थिती नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Pimpri Chinchwad Drain Encroachment
Pimpri Chinchwad Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला वेग; २९ जुलैपूर्वी फॉर्म न भरल्यास प्रारूप यादीत नाव येणार नाही

धडक कारवाई करून नाले अतिक्रमणमुक्त करणार

पावसाळ्यामध्ये नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. या घटनांचा आणि कारणांचा शोध घेतला. त्यामध्ये सुमारे ३५० ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे.

अशा ठिकाणी आता महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नाल्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडणार नाहीत, असा दावा महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news