

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 11) बाजारात भाज्यांचे दर घसरले होते. टोमॅटोचे दरही कमी झाले आहेत. मटार, गाजर 40 ते 50 रूपये किलो दराने विक्री केली जात होती. शेवग्याचे दर 400 वरून 200 रूपये किलो पर्यंत खाली आले आहेत.
पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक यांचे दर 15 रूपये प्रति जुडी होते. फळभाज्यांमध्ये काकडी च्या दरात वाढ झाली असून इतर भाज्यांचे दर कमी झाले आहेत. हिरवी मिरचीचे भाव वाढले आहेत. कांदा 20 - 30 रूपये किलो दराने विक्री केली जात आहे. लसूण 180 - 200 रुपये तर आले 70 - 80 रुपये किलो दराने उपलब्ध होते.
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
रविवारी बाजारात गवार 150 रुपये किलो, शेवगा 170 रुपये किलो, मटार 30 रुपये किलो, टोमॅटो 30, भेंडी 70, फ्लॉवर 30, कोबी 25, मिरची 70, गाजर 40, शिमला 70, लसूण 180, आले 70, वांगी 40, काकडी 50, कारले 70, कांदे 20 ते 30, बटाटा 25, बिन्स 70, पावटा 70, भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 60, तोंडली 80, बीट 30, दुधी 40, घेवडा 70 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी
कोथिंबीर 10 - 15 रुपये, मेथी 15, पालक 15, शेपू 15, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 20, चवळई 20, लाल माठ 20, कांदापात 20, करडई 20, आळू पाने 15, चुका 20 रूपये विक्री केली जात आहे.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
तोंडली 80 रुपये, बीट 40, वाल 80, दोडका 80, कारली 80, भरताची वांगी 60, भेंडी 80, मिरची 80, फ्लॉवर 40, कोबी 30, वांगी 60, तोंडली 80, घोसाळे 70, पडवळ 70, दुधी भोपळा 60, पापडी 80, परवल 80, सुरण 80 रूपये, मद्रास काकडी 40 रूपये, आरबी 50 रूपये किलो, सिमला 60 रूपये, राजमा 70 काळा, राजमा लाल 70, बिन्स 70, गाजर 50, रताळी 60, टोमॅटो 50, बिन्स 50 रुपये दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 9, बटाटा 10, आले 45, लसूण 150, भेंडी 50, गवार 100 , टोमॅटो 20, वाटाणा 30, घेवडा 40, दोडका 45, हिरवी मिरची 50, दुधी भोपळा 25, काकडी 30, कारली 55, गाजर 30, फ्लॉवर 30, कोबी 20, वांगी 35, ढोबळी 45, तोंडली 0, बीट 30, शेवगा 180, घोसाळी 30, मका कणीस 15 रुपये प्रतिकिलो दर होते.