PCMC Election Voting EVM: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक; गुरुवारी मतदान, प्रशासन सज्ज

2,067 मतदान केंद्रे, 692 उमेदवार; ईव्हीएम सीलिंग व टपाली मतदानास सुरुवात
EVM
EVM Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरूवार (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला आहे. महापालिका प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शहरभरात 2 हजार 67 मतदान केंद्रे आहेत. तर मतमोजणी शुक्रवार (दि. 16) आठ ठिकाणी होणार आहे.

EVM
Pimpri Chinchwad Flood Line: पिंपरी-चिंचवडमध्ये निळी व लाल पूररेषा नव्याने ठरवणार

महापालिकेसाठी 32 प्रभागांत 128 जागा आहेत. त्यासाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 6 व 10 मधून अनुक्रमे भाजपचे रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता 126 जागांसाठी मतदान होत आहे. एका मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. निवडणुकीसाठी 10 हजार 335 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात 2 हजार 67 मतदान केंद्रांमध्ये एकूण 7 हजार 149 मतदान यंत्र (ईव्हीएम-बॅलेट युनिट) आणि 2 हजार 900 कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई असेल. केंद्रांकरिता साहित्याचे किट तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य तसेच, कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी एकूण 521 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात पीएमपीएल बसचा समावेश आहे.

EVM
PCMC Election Campaign: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: अवघे पाच दिवस, रविवारी प्रभागांमध्ये प्रचाराचा धुरळा

मतदान यंत्रे सील करण्यास सुरुवात

महापालिका निवडणुकीसाठी लागणार सर्व ईव्हीएम मशिन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. ते मशिन सुव्यस्थित असल्याची खात्री करून घेण्यात आली आहे. ते ईव्हीएम मशिन शहरातील आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे पाठवले जात आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर ईव्हीएम मशिन सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.

EVM
Kharalwadi Bus Stop: खराळवाडीतील गोकुळ हॉटेल बसथांब्यांची दुरवस्था; प्रवाशांचे हाल

महापालिका भवनात टपाली मतदानांची सोय

निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी टपाली मतदानाची सोय केली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पिंपरी येथील महापालिका भवनात दुसर्या मजल्यावर टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. कर्मचारी टपाली मतदान करत आहेत.

EVM
Lonavala Nagar Parishad: लोणावळा नगर परिषदेची पहिली सभा 13 जानेवारीला; उपनगराध्यक्ष पदाची उत्सुकता

असे रोखणार दुबार मतदान

महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 92 हजारांपेक्षा अधिक दुबार मतदार आहेत. या मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार येथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास त्या मतदार यादीत तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news