Pimpri Vegetable Market: पिंपरीत कांदा ५० रुपयांवर; लसूण-आल्यानेही शंभरी पार, श्रावणामुळे रताळ्याला मागणी

लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पालेभाज्या स्वस्त; मोशी उपबाजारात कांदा २५, बटाटा ९ रुपये किलो
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. ३०) कांदा ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केला जात आहे. लसूण आणि आले देखील २०० रुपये किलो, श्रावण महिन्यामुळे रताळे १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. लसूण, आले यांची आवक मंदावल्याने दर वाढले आहेत. तर कांद्याची निर्यात वाढल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. टोमॅटो २० रुपये दराने विक्री केला जात आहे. पावसाच्या उघडीपमुळे पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मेथी, कोथिंबीर १० रुपये जुडी विक्री केली जात आहे. इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

Vegetable
Pimpri Chinchwad Traffic Police: पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक शाखेत ‘ड्युटी नको रे बाबा’; ८० पोलिसांची प्रतिनियुक्ती, अनेक कर्मचारी गैरहजर

गाजर ६० रुपये, बीट ५० रुपये, वाटाणा १०० - १२० रुपये, बीन्स ७० रुपये, राजमा ८० रुपये, वांगी ५० रुपये, गवार ८० रुपये, शेवगा ८० रुपये, दोडका ८० रुपये, फ्लॉवर ६० - ७० रुपये, कोबी ५० रुपये, काकडी ४० रुपये, टोमॅटो ३० रुपये, शिमला ५० रुपये, मिरची ५० रुपये, लसूण २०० रुपये, आले २०० रुपये, तोंडली ७० - ८० रुपये, बटाटा २५ - ३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे:

रविवारी बाजारात गवार ७० रुपये किलो, शेवगा ८०, टोमॅटो २०, भेंडी ५०, फ्लॉवर ६०, कोबी ५०, मिरची ५०, गाजर ५०, शिमला ५०, लसूण २२५ - २५० रुपये, आले २००, वांगी ५०, काकडी ४०, कारले ६० , कांदे ४० - ४५ किलो, बटाटा २५ - ३० रुपये, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ४०, दोडका ६०, तोंडली ६०, बीट ५०, दुधी भोपळा ५०, घेवडा ५० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Dowry Death Case: हुंडाबळी, महिला अत्याचार थांबणार कधी?; दोषींना कठोर शिक्षा द्या: सुषमा अंधारे

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर १० - १५ रुपये, मेथी १० - १५, पालक १५ - २०, शेपू १५ - २०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २०, चवळई १५, लाल माठ १५, करडई २०, कांदापात २०, करडई १५, आळू पाने १० रुपये जुडी, आंबट चुका १५ जुडी.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ९० रुपये, गवार ८०, पावटा ७०, तोंडली ७०, बीट ५०, दोडका ७०, कारली ७०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर ७०, कोबी ६०, वांगी ६०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ५०, पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रूपये, मद्रास काकडी ३० रूपये, आरबी 80 रूपये किलो, सिमला ७० रुपये, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ६० रूपये किलो, आरवी ८०, रताळी ७० रूपये, टोमॅटो २५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Old Sangvi Water Crisis: नव्या सांगवीत व्हर्टिकल शाफ्ट, मग जुन्या सांगवीला का डावलता?; पाण्यासाठी नागरिकांचा संतप्त सवाल

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा २५, बटाटा ९, लसूण ९०, आले ८० , भेंडी २५, गवार ५०, टोमॅटो १२, वाटाणा ७५, घेवडा ४५, दोडका ३५, हिरवी मिरची २५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३०, गाजर २५, फ्लॉवर २५, कोबी २०, ढोबळी ३५, वांगी २५, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू ५०, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी ४२६१, पालेभाजी ३८४०० (गड्डी), फळे आवक ७१२, कांदा ५१५, बटाटा ९८०, लसूण ४०, आले ११०, भेंडी १२३, गवार ३६, टोमॅटो ५७७, वाटाणा ५४, घेवडा ९०, दोडका ५१, हिरवी मिरची १८१, दुधी भोपळा १०५, काकडी १६०, कारली ४१, डांगर ६७, गाजर ५८, फ्लॉवर २७०, कोबी २४९, वांगी १५६, ढोबळी ९४, बीट १६, शेवगा ४०, लिंबू ५२, मका कणीस ५१, तोंडली १५, रताळी २ क्विंटल इतकी आवक झाली.

Vegetable
Pimpri Chinchwad General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबरची सभा वादात; ‘सात दिवसांची नोटीस’ की नियमभंग?

आलुबुखार, ड्रॅगनफ्रूट, डाळिंबाची आवक

पिंपरी फळ बाजारात आलुबुखार, ड्रॅगनफ्रूट आणि डाळींबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डाळींब आणि ड्रॅगनफ्रूट प्रतिकिलो १०० - १२० रुपये दराने विक्री होत असल्याने नागरिक खरेदीस पसंती देत आहेत. तर आलुबुखार २२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

फळांचे दर प्रतिकिलो खालीलप्रमाणे :

सफरचंद १०० - १५० रुपये, मोसंबी १५० - २०० , संत्री १५० , डाळिंब १०० - १५० , पेरू १०० रुपये, अंजीर १०० रुपये, पपई ५० - ६० रुपये, केळी ५० - ६० रुपये, अननस १२० प्रतिनग, पिअर २६० रुपये, ड्रॅगनफ्रूट पांढरे १०० रुपये, लाल ड्रॅगनफ्रूट १०० रुपये, किवी १२० - १३०, चिकू ८० - १०० रुपये, नाशपती १४० रुपये, सीताफळ १०० रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news