Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात कांदा, लसूण, आले तेजीत; लिंबू २०० रुपये किलो

कांद्याच्या दरात पंधरवड्यात दुप्पट वाढ; आवक मंदावल्याने आले-लसणाचे दरही चढे, पालेभाज्यांचे भाव स्थिर
Onion
OnionPudhari File Photo
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. २०) लसूण, आल्याचे आणि कांद्याचे दर तेजीतच होते. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो दराने विक्री केली जात होती. आले १०० ते १५० रुपये किलो दर आहे. कांदे ५० - ६० रुपये, लसूण १८० - २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर दुधी भोपळा, काकडी, गाजर आणि कारली २५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. इतर पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर स्थिर होते.

Onion
Pimpri Chinchwad NDPS Wanted Accused: पिंपरी-चिंचवडमध्ये एनडीपीएसचे ७३ आरोपी ‘वॉन्टेड’; न्यायालयीन प्रक्रियेतून कोंडी

पंधरा दिवसांपूर्वी २५ - ३० रुपये प्रतिकिलो दराने असणारा कांदा सध्या ५० - ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. लसूण, आले यांची आवक मंदावल्याने दर वाढले आहेत. तर कांद्याची निर्यात वाढल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. टोमॅटो ३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. पावसाच्या उघडीपमुळे पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मेथी, कोथिंबीर १५ - २० रुपये जुडी दराने विक्री केली जात आहे.

Onion
PCMC Unauthorized Water Connections: पिंपरी-चिंचवडमध्ये १७ हजार ५०० अनधिकृत नळजोड आढळले; १३ हजार ५०० झाले अधिकृत

गाजर २५ रुपये, बीट ५० रुपये, वाटाणा ८० - ९० रुपये, बीन्स ७० रुपये, राजमा ८० रुपये, वांगी २५ रुपये, गवार ७० रुपये, शेवगा ८० रुपये, दोडका ८० रुपये, फ्लॉवर २० रुपये, कोबी १० रुपये, काकडी २५ रुपये, टोमॅटो ३० रुपये, शिमला ६० रुपये, मिरची ६० रुपये, लसूण १८० - २०० रुपये, आले १०० - १५० रुपये, तोंडली ७० - ८० रुपये, बटाटा २५ - ३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे

रविवारी बाजारात गवार ७० रुपये किलो, शेवगा ८०, टोमॅटो ३०, भेंडी ६०, फ्लॉवर २५, कोबी १५, मिरची ६०, गाजर २५, शिमला ६०, लसूण १८० - २००, आले १५०,वांगी २५, काकडी २५, कारले २५ , कांदे ५० - ६० रुपये किलो, बटाटा २५ - ३०, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ४०, दोडका ६०, तोंडली ७०, बीट ५०, दुधी २५, घेवडा ५० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Onion
Maval Ganesh Visarjan DJ: मावळात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार की नाही?; मंडळांसह डीजे व्यावसायिकांची उत्सुकता

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर १५ - २० रुपये, मेथी १५ - २० रुपये, पालक १५, शेपू १५, राजगिरा १५, पुदिना १५, मुळा १५, चवळई १५, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई १५, कांदापात १५, करडई १५, आळू पाने १० रुपये जुडी, आंबट चुका १५ रुपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ९० रुपये, गवार ८०, पावटा ७०, तोंडली ७०, बीट ५० , दोडका ७०, कारली ३० - ३५ , भरताची वांगी ५०, भेंडी ५०, मिरची ७०, फ्लॉवर २५, कोबी २०, वांगी ३० - ३५ , घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३० - ३५ , पापडी ९०, पावटा ८०, सुरण ९०, मद्रास काकडी ३०- ३५, आरबी 80, सिमला ७० रुपये, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ३० - ३५ रुपये किलो, रताळी ७० रुपये, टोमॅटो ३० रुपये प्रतिकिलो असे दर आहेत.

Onion
PCMC Footpath Encroachment: पदपथावर अतिक्रमण, सायकल ट्रॅकवर वाहने; आता मालवाहू वाहनांचा ठिय्या!

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा ३५, बटाटा १०, लसूण १००, आले १०० , भेंडी १५, गवार ४०, टोमॅटो १५, वाटाणा ६०, घेवडा ३५, दोडका ३०, हिरवी मिरची ३५, दुधी भोपळा १५, काकडी १५, कारली २५, गाजर २५, फ्लॉवर १५, कोबी १०, ढोबळी २०, वांगी १५, शेवगा ३५, घोसाळी ३०, लिंबू १९०, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४६५२, पालेभाजी ५५३०० (गड्डी), फळे आवक ६१६, कांदा ६०७, बटाटा १२१५, लसूण १०, आले ५५, भेंडी १६५, गवार २६, टोमॅटो ५४६, वाटाणा ३३, घेवडा ७९, दोडका २८, हिरवी मिरची १३६, दुधी भोपळा ८९, काकडी १८८, कारली ८१, डांगर ९१, गाजर ८४, फ्लॉवर ३३४, कोबी २९५, वांगी १५९, ढोबळी ९१, बीट १९, शेवगा ६६, लिंबू ३०, मका कणीस ९५, तोंडली ८, रताळी २ क्विंटल इतकी आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news