Watermelon
WatermelonPudhari

Pimpri Vegetable Fruit Market Prices: फळभाज्यांचे दर स्थिर, खरबूज-कलिंगडाची मागणी वाढली

शिमला, बीट, बिन्ससह फळभाज्यांची आवक जास्त, पालेभाज्यांचे दर स्थिर; उन्हाळ्यामुळे फळांची मागणी वाढली
Published on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 1) बाजारात फळभाज्याचे दर स्थिर होते. तर, शिमला, बिन्स आणि बीटची आवक जास्त झाली होती. शिमला 50-60 तर बिन्सचा 70 रूपये किलो भाव होता. फळभाज्यांमध्ये वांगी, कोबी, फ्लॉवरचे दर कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Watermelon
Pimpri Chinchwad Police Zone Restructuring: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची परिमंडळ फेररचना

वाटाणा, गाजर यांचे दर नेहमीप्रमाणे 30 ते 40 रूपये होते. शेवग्याचे दर 120 रूपये किलोपर्यंत खाली आले होते. तर, गवारचा बाजारात तुटवडा होता. त्यामुळे याचे दर जास्त होते. बाजारात पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांचे दर 15 रूपये प्रति जुडी होते. कांदे 20-30, लसूण 180-200 तर आल्याची 60-70 रूपये किलो दराने विक्री झाली.

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

रविवारी बाजारात गवार 150, शेवगा 120, वाटाणा 30, टोमॅटो 25, भेंडी 60, फ्लॉवर 40, कोबी 30, मिरची 60, गाजर 30, शिमला 50, लसूण 180-200, आले 60, वांगी 40, काकडी 30, कारले 60, कांदे 20-25, बटाटा 25-30, बिन्स 50, पावटा 60, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 50, तोंडली 70, बीट 30, दुधी 50, घेवडा 50.

Watermelon
Pimpri Chinchawad Sunny Waghchaure Extortion Threat: ‘गोल्डन मॅन’ सनी नाना वाघचौरे यांना पाच कोटींची खंडणी; जीवे मारण्याची धमकी

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे दर (रुपयांत) प्रति जुडी

कोथिंबीर 15, मेथी 15, पालक 15, शेपू 15, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 25, चवळई 15, लालमाठ 15, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 10, आंबट चुका 20, गवती चहा 10.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रुपयांत)

शेवगा 120, गवार 150, पावटा 70, तोंडली 80, वाटाणा 40, बीट 30, दोडका 70, कारली 60, भरताची वांगी 30-40, भेंडी 70, मिरची 70, फ्लॉवर 40, कोबी 30, वांगी 40, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, परवल 80, सुरण 80, मद्रास काकडी 40, आरबी 50, सिमला 70, राजमा 50 काळा, राजमा लाल 50, बिन्स 50, गाजर 40, आवळा 60-70, रताळी 60, टोमॅटो 30, बिन्स 50, काकडी 40.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रति किलो, रुपयांत)

कांदा 10, बटाटा 8, आले 35, लसूण 100, भेंडी 35, गवार 100, टोमॅटो 12, वाटाणा 25, घेवडा 45, दोडका 35, हिरवी मिरची 70, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 35, गाजर 25, फ्लॉवर 15, कोबी 10, वांगी 35, ढोबळी 45, तोंडली 45, बीट 30, शेवगा 110, घोसाळी 35, मका कणीस 15.

Watermelon
Pimpri Chinchwad Civic Challenges: वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडसमोर आव्हानांचा डोंगर

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी : 5767, पालेभाजी : 86500 (गड्डी), फळे : 803

कांदा 651, बटाटा 462, आले 59, लसूण 30, भेंडी 120, गवार 7, टोमॅटो 802, वाटाणा 395, घेवडा 76, दोडका 4, हिरवी मिरची 223, दुधी भोपळा 19, काकडी 110, कारली 20, डांगर 22, गाजर 272, फ्लॉवर 456, कोबी 306, वांगी 136, ढोबळी 71, बीट 44, शेवगा 22, लिंबू 115, मका कणीस 101, तोंडली 4, रताळी 5.

Watermelon
Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६ फेब्रुवारीला महापौर निवड

पिंपरी फळ बाजारात खरबूज, कलिंगडांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, उन्हाचा चटका लागत असल्याने ग््रााहकांची याला मागणी वाढत आहे. खरबूज आणि कलिंगड 100 रुपयांना दीड किलो तर अननसाचा 140 रूपये किलो दर होता. इतर फळांचे दर स्थिर होते.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे

केळी 50-60 रूपये डझन, संत्री 100, चिकू 100, सफरचंद 200, मोसंबी 100, डाळिंब 260, पेरू 100 रुपयांना दीड किलो, पपई 60, पिअर 200-240, ड्रॅगनफुट पांढरे 100 रुपयांना दीड किलो, किवी 100, नाश्पती 120, आलुबुखार 150, अननस 100, अंजीर 100, बोर 50, स्ट्रॉबेरी 100.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news