Spring Season Flowers Pimpri: पिंपरीत वसंताची चाहूल; लाल-केशरी फुलांनी शहर बहरले

पळस, बोगनवेल, झेंडूसह विविध फुलांनी दिली वसंताच्या आगमनाची वर्दी
Spring Season Flowers
Spring Season FlowersPudhari
Published on
Updated on

खराळवाडी: वसंत ऋतूला सुरुवात होताच निसर्गात नवचैतन्य संचारत असल्याचे दिसून येते. पाने, फुले झडून निष्पर्ण झालेली झाडे आता बहरताना दिसून येतात. वसंतऋतू सुरू होताच लाल केशरी रंगाचा शालू पांघरुन बोगनवेलच्या फुलांना बहर येतो. लाल पिवळ्या रंगाच्या फुलांची उधळण करीत रस्त्यावर कंपाऊंडच्या तारेवर रखरखत्या उन्हात गोकर्ण, सूर्यफूल, झेंडू, सदाबहार (पेरिविंकल), झिनिया आणि जास्वंद या लाल- पांढरी-पिवळी फुलं वसंतऋतू बहरल्याची साक्ष देत आहेत.

Spring Season Flowers
Lonavala Propylene Gas Tanker Incident: बोरघाटात प्रोपिलीन गॅस टँकरचा ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

पिंपरी शहर व उपनगरांत रस्त्यावर आणि पिंपरी शहरातील सार्वजनिक टेकड्या अन्‌‍ उद्यानांत हे दृष्य दिसत आहे. उन्हात कोरड्या वातावरणामध्ये झेंडू, सदाबहार (पेरीविंकल), बोगनवेल, झिनिया हे फुले टवटवीत दिसतात. मराठी दिनदर्शकािच्या मते आपल्याकडे वसंतऋतू गुढी पाडव्यापासून सुरू असतो, असे मानले जाते. दरवर्षी गुढीपाडवा मार्चच्या तिसऱ्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. तिथपासून मे अखेरपर्यंत वसंत ऋतू मानला जातो. गुढी पाडवा हा सण मार्च महिन्यात असतो.

Spring Season Flowers
Maval Gram Panchayat Administrator Decision: मावळात ७३ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारभार; सरपंचच असणार प्रशासक

त्यामुळे त्या दिवसापासून माहे (20 मे) पर्यंत वसंत ऋतूची कालगणना केली जाते. मात्र, शहरात भूगोल विषयातील तज्ज्ञ गणेश सुवासे यांच्या मते खरा वसंत हा फेबुवारी ते एप्रिल या कालावधीतच असतो. कारण याच कालावधीत पिंपरी शहरासह इतर ठिकाणी वसंत ऋतूमध्ये फुलणाऱ्या वनस्पतीच या ऋतूचे खरे साक्षीदार आहेत. याच कालावधीत निसर्गात जी झाडे फुलतात ती प्रसन्न वसंताची वर्दी देतात.

Spring Season Flowers
Dehu Indrayani River Pollution: बीजसोहळ्याआधी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; वारकऱ्यांत संताप

वसंतात फुलतात ही झाडे

वसंतात पळस, सोनसावर, पांगारा, अशोक, कांचन, काटेसावर, गेळा, धावडा, फणशी, बेल, महाधावडा, मेडशिंगी ही झाडे फुलतात. पळसाची लाल केशरी रंगीची फुले आपल्याला वसंताच्या आगमनाची वर्दी फेबुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच देतात. तसेच, बेलाचे झाड जानेवारीपर्यंत शुष्क कोरडे झालेले असते, मात्र फेबुवारी ते एप्रिलदरम्यान त्याला नवी पालवी येते. ही कोवळी पानेही वसंताच्या आगमनाची चाहूल देतात.

Spring Season Flowers
PCMC Departmental Inquiry: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 38 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी

खरा वसंत फेबुवारी महिन्याच्या शेवटी सुरू होऊन एप्रिल महिन्यात म्हणजे दोनच महिने असतो. त्यापुढे कडक उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे त्याला वसंत ऋतूचा काळ म्हणतात. याच काळात कडक उन्हामुळे झाडांच्या बिया वाळून खाली पडतात अन्‌‍ पावसाळ्यात जूनमध्ये त्यातून पुन्हा रोपांची निर्मतीि होते, असे हे निसर्गाचे सूत्र आहे.

प्रा. प्रशांत कोकणे, पर्यावरणप्रेमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news