Maval Gram Panchayat Administrator Decision: मावळात ७३ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारभार; सरपंचच असणार प्रशासक

कालावधी संपलेल्या व संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर शासन निर्णय; मे महिन्यात निवडणुकांची शक्यता
Vadgaon Nagar Panchayat
Vadgaon Nagar PanchayatPudhari
Published on
Updated on

गणेश विनोदे

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील एकूण 103 ग््राामपंचायतींपैकी 16 ग््राामपंचायतींवर यापूर्वीच कालावधी संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले असून, फेबुवारीअखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या 57 ग््राामपंचायतींवर आता शासन निर्णयानुसार सरपंच प्रशासक म्हणून नियुक्त होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील तब्बल 73 ग््राामपंचायतींवर आता प्रशासकीय कारभार असणार आहे. तसेच, या सर्वच ग््राामपंचायतींच्या निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे.

Vadgaon Nagar Panchayat
Dehu Indrayani River Pollution: बीजसोहळ्याआधी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; वारकऱ्यांत संताप

तालुक्यातील तुंग, करूंज, कडधे, डोगरगाव, ठाकुरसाई, पुसाणे, शिळाटणे, वराळे, नाणेली तर्फे चाकण, टाकवे खु, औढे खु, ओझर्डे, केवरे, काले या ग््राामपंचायतींची मुदत दीड ते दोन वर्षापूर्वी संपली आहे. तर, कान्हे व जाभूळ या ग््राामपंचायतीची मुदत एक वर्षापूर्वी संपली आहे. संबंधित 16 ग््राामपंचायतींवर कालावधी संपल्यावर लगेचच शासकीय प्रकाशक नेमण्यात आले असून, एक ते दोन वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे.

Vadgaon Nagar Panchayat
PCMC Departmental Inquiry: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 38 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी

दरम्यान, 57 ग््राामपंचायतींची मुदत फेबुवारी 2026 अखेरपर्यंत संपणार असून, शासन निर्णयानुसार मुदत संपणाऱ्या ग््राामपंचायतींवर विद्यमान सरपंच हे प्रशासक तर सदस्यांची प्रशासकीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या 57 ग््राामपंचायतींचा कारभार तेच कारभारी पाहणार आहेत. फक्त ते लोकप्रतिनिधी म्हणून नाही, तर प्रशासक म्हणून असणार आहेत.

Vadgaon Nagar Panchayat
Pimpri Chinchwad Online Police Complaints: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑनलाइन पोलिस तक्रारींचा पूर; बहुतांश तक्रारी तथ्यहीन

ग््राामीण भागात पुन्हा निवडणुकीचे वातावरण

मावळ तालुक्यात 103 ग््राामपंचायती असून, यापैकी तब्बल 73 ग््राामपंचायतींचा कालावधी संपला आहे. तसेच, यापूर्वी मुदत संपलेल्या ग््राामपंचातींची प्रभाग रचनाही झालेली आहे. तर, आता मुदत संपणाऱ्या ग््राामपंचायतींची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे साधारणतः मे महिन्यात या सर्व ग््राामपंचायतींची निवडणूक होण्याची शक्यता असून, नुकत्याच ग््राामीण भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेतं. त्यामुळे चार पाच महिन्यांत ग््राामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

Vadgaon Nagar Panchayat
Pimpri Bhosari AQI 421: पिंपरी-भोसरीत AQI ४२१ ते ४२७; घातक हवेचा इशारा

या 57 ग््राामपंचायतींवर सरपंच असणार प्रशासक

करंजगाव, धामणे, वारू, टाकवे बु., शिवणे/सडवली, येलघोल, चिखलसे, नाणे, सांगवडे, कुसगाव बु., पाटण, परंदवडी, वेहेरगाव, मळवंडी ठुले, कोथुर्णे, आंबेगाव, आढले खु., शिवली, सोमाटणे, माळवाडी, येळसे, मोरवे, थुगाव, अजिवली, तिकोणा, घोणशेत, कुसवली, डाहुली, साते, गोवित्री, शिरदे, कांबे, आंबी, दारुंबे, खांडशी, मळवली, गहुंजे, इंगळुन, उर्से, नवलाख उंबे, महागाव, वडेश्वर, साई, खांड, कुसगाव प.मा., पाचाणे, खडकाळे, आपटी, बऊर, ताजे, कुसगाव खु., कार्ला, कशाळ, कुरवंडे, माळेगाव बु., आढे, उकसान.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news