Pimpri Property Tax Collection: पिंपरीत मालमत्ताकराचा विक्रमी भरणा; 923 कोटींचा टप्पा पार

अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; 90% दंडमाफीचा लाभ घेण्याचे आवाहन
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून 8 कोटी 25 लाख रुपयांचा विक्रमी भरणा झाला आहे. उद्या मंगळवार (दि. 31) अभय योजनेचा शेवटचा दिवस असून, थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

Property Tax
Pimpri Development Works: कासारवाडीतील 12 मीटर रस्त्यासाठी भूसंपादनाला मंजुरी; विविध विकासकामांना हिरवा कंदील

महापालिकेकडे एकूण 7 लाख 32 हजार मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी 5 लाख 87 हजारांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी मालकत्ताकराचा भरणा केला आहे. आज सायंकाळपर्यंत एकूण 923 कोटी 63 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. ऑनलाईन, एनईएफटीच्या माध्यमातून नागरिकांकडून बिलाचा भरणा करण्यात येत आहे.

Property Tax
Pimpri Gas Shortage: पिंपरीत गॅस टंचाईचा फटका; इंडक्शन-शेगडीचे दर दुप्पट

एकणू 39 कोटींची सवलत

तर, अभय योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, विलंब दंडावरील 90 टक्के सवलत मिळत असल्याने थकबाकीदार संपूर्ण बिल भरून मोकळे होत आहेत. त्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 158 कोटींपेक्षा अधिकचा भरणा झाला आहे. त्यातून एकूण 39 कोटी रुपयांची सवलत दिली गेली आहे. अभय योजनेचा उद्या मंगळवारी शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन माध्यमातून रात्री बारापर्यंत सूट मिळू शकणार आहे. थकबाकीदारांनी तातडीने बिल भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Property Tax
Pimpri Unseasonal Rain Chaos: पहिल्याच पावसात पिंपरीत महापालिकेची पोलखोल; पाणी साचून वाहतूक कोंडी

वाकड विभागीय कार्यालयाकडून सर्वांधिक 111 कोटी जमा

करसंकलन विभागाची 1 एप्रिल 2025 पासून ते 30 मार्च 2026 या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वांत जास्त मालमत्ताकर जमा झाला आहे. त्या कार्यालयाने आत्तापर्यंत 110 कोटी रुपये वसूल केले आहेत. थेरगाव 93 कोटी रुपये जमा केले आहेत. चिखली कार्यालयाने 79 कोटी 56 लाख, किवळे 62 कोटी 58 लाख, भोसरी 60 कोटी 30 लाख, मोशी 59 कोटी 10 लाख,

Property Tax
Pimpri Chinchwad Rain Impact: पिंपरी-चिंचवडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

चिंचवड 56 कोटी 82लाख, कस्पटे वस्ती 56 कोटी, पिंपरीगाव 49 कोटी 14, सांगवी 45 कोटी 6 लाख, महापालिका भवन 40 कोटी 10 लाख, आकुर्डी 39 कोटी 2 लाख, चऱ्होली 36 कोटी 46 लाख, फुगेवाडी-दापोडी 34 कोटी 48 लाख, दिघी-बोपखेल 26 कोटी 41 लाख, तळवडे 25 कोटी 3 लाख, निगडी-प्राधिकरण 20 कोटी 16 लाख आणि पिंपरी कॅम्प विभागीय कार्यालयात 8 कोटी 12 लाख रुपये मालमत्ता करातून जमा झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news