Pimpri Development Works: कासारवाडीतील 12 मीटर रस्त्यासाठी भूसंपादनाला मंजुरी; विविध विकासकामांना हिरवा कंदील

स्थायी समितीचा निर्णय; शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांना गती
Pimpri Development Works
Pimpri Development WorksPudhari
Published on
Updated on

पिंपरी: कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 498 मधील मंजूर विकास योजनेतील डीपीनुसार प्रस्तावित 12 मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तसेच, शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Pimpri Development Works
Pimpri Gas Shortage: पिंपरीत गॅस टंचाईचा फटका; इंडक्शन-शेगडीचे दर दुप्पट

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. सभेला समिती सदस्यांसह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे व अधिकारी उपस्थित होते.

Pimpri Development Works
Pimpri Unseasonal Rain Chaos: पहिल्याच पावसात पिंपरीत महापालिकेची पोलखोल; पाणी साचून वाहतूक कोंडी

निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील उद्यानातील स्थापत्य कामे करणे, कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रासाठी सीमाभिंत बांधणे, सांगवी-किवळे रस्त्यावरील बसथांब्यांची देखभाल व दुरुस्ती करणे, रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील 1600 किलोवॅट क्षमतेच्या रोहित्र संच व बेकर्सच्या देखभाल-दुरुस्ती करणे, सेक्टर क्रमांक 10 येथे पर्यायी ट्रान्सफॉर्मर व आरएमयू युनिट बसविणे, विविध पंपिंग हाऊस येथे सॉफ्ट स्टार्टर बसविणे, झोपडपट्टीधारकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 29/2 येथील सुमारे 30 हजार चौरस फूट जागा संक्रमण शिबिरासाठी 3 वर्षे भाडेतत्त्वावर देणे,

Pimpri Development Works
Pimpri Chinchwad Rain Impact: पिंपरी-चिंचवडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील पाणीपुरवठा ट्रेंचेसचे डांबरीकरण करणे, पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती करणे, थेरगाव गावठाण पंप हाऊस येथील पंपाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक विद्युत कामे करणे, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपीएल) सन 2024-25 या आर्थकि वर्षातील संचलन तुटीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या अवलोकन करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Pimpri Development Works
Pimpri Compost Waste: पिंपरीत ओल्या कचऱ्यापासून तयार खताचा प्रश्न गंभीर

याशिवाय पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयातील विद्युत देखभाल व दुरुस्ती करणे, फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शाळा, इमारती व कार्यालयांमधील हमी कालावधी संपलेले नादुरुस्त इन्व्हर्टर व बॅटरी बदलणे, वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 19 टाटा सुमो किंवा इतर वाहने 2 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेणे, प्रभाग क्रमांक 8 मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉग शेड परिसरातील स्थापत्य दुरुस्ती करणे, प्रभाग क्रमांक 9 व 2 मधील स्वच्छतागृह दुरुस्ती करणे आदी कामांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news