Pimpri PMPML AC Bus Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या उन्हामुळे एसी बसला मोठी मागणी

आठ दिवसांत दररोज सरासरी 10.82 लाख प्रवासी; पीएमपीच्या इलेक्ट्रीक बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी
PMPML Bus
PMPML Bus Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. यामुळे पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करण्यास प्रवासी प्रधान्य देत आहेत. एक ते 8 एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी 10 लाख 82 हजार 183 जणांनी एसी बसमधून प्रवास केला आहे.

PMPML Bus
PMRDA Hoarding Rules: पीएमआरडीएचा मोठा निर्णय; आकाशचिन्हे विभाग स्थापन, अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा इशारा

पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा शहरातील उत्तम सेवा मानली जाते. पीएमपीच्या बस पुणे ते पिंपरी चिंचवड शहरासह पीएमआरडीए भागात धावतात. त्यामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्यांमध्ये नोकदार, महिला, विद्यार्थी यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्वी डिझेल, सीएनजीच्या बस उपलब्ध होत्या. मात्र, मागील काही वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत.

PMPML Bus
Pimpri Crime: चाकण हादरले! आई आणि प्रियकराने 6 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

यंदा फेब्रुवारीपासून उन्हाचा चटका बसू लागला आहे. सध्या शहरात उन्हाचा पारा 40 ते 42 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका सहन होणार नसल्याने प्रवासी इलेक्ट्रिक बसची वाट पाहत थांबतात. कारण अन्य बसमधून प्रवास करताना नागरिक घामाघूम होत आहेत. त्यामुळे प्रवासी एसी बसची वाट पाहत थांबतात. अतिशय उत्तम सुविधा प्रवाशांना मिळत असल्याने इलेक्ट्रीक एसी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होत आहे.

PMPML Bus
Pimpri Chinchwad 52 Crore Bill Scam: पिंपरी-चिंचवड महापालिकेत 52 कोटींचा घोटाळा? चौकशी समितीची स्थापना

या भागात धावतात एसी बस

निगडी, चर्होली, पुणे स्टेशन, वाघोली, माण, बाणेर या भागात इलेक्ट्रीक एसी बस धावतात.

एसी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या

  • 1 एप्रिल - 11 लाख 9 हजार 77

  • 2 एप्रिल - 10 लाख 75 हजार 200

  • 3 एप्रिल - 10 लाख 1 हजार 964

  • 4 एप्रिल - 10 लाख 60 हजार 694

  • 5 एप्रिल - 9 लाख 79 हजार 471

  • 6 एप्रिल - 11 लाख 77 हजार 651

  • 7 एप्रिल - 11 लाख 36 हजार 475

  • 8 एप्रिल - 11 लाख 16 हजार 929

PMPML Bus
Pimpri Nigdi Metro Road Issue: रस्ते दुरुस्तीशिवाय मेट्रोला निधी नाही; महापालिकेचा ठाम निर्णय

सध्या उन्हाचा पारा अधिक वाढल्याने मी एसी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य देते. पीएमपीच्या साध्या बसमधून प्रवास करताना उन्हामुळे डोके दुखते. तसेच, या बसचा आवाजही जास्त येतो.

प्रीति दळवी, प्रवासी

सकाळी अकरानतंर उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात होते. शिवाजीनगर येथे नोकरीला असल्यामुळे पुण्यात जाण्यासाठी पीएमपी बसने जाते. वाढत्या तापमानामुळे एसी बसमधून प्रवास करण्यास प्रधान्य देतो.

करण सगट, प्रवासी

पीएमपीच्या साध्या बसमधून प्रवास केल्यास खिडक्यांमधून धूळ, वारा, आणि ऊन येते, परंतु हेच जर एसी बसमधून प्रवास केला हा त्रास जाणवत नाही. त्यामुळे मी प्रवासासाठी एसी बसला प्रधान्य देते.

दिप्ती कदम, प्रवासी

साध्या पीएमपी बसच्या तुलनेत एसी बसला प्रवाशांची अधिक मागणी वाढली आहे. कारण या बसमधून प्रवास आरामदायी होत आहे. एसी बसच्या खिडकी बंद असल्यामुळे गरम वारा अंगावर येत नाही.

यशवंत हिंगे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news