Drug trafficking case
DrugsCanava

Pimpri Drug Seizure: लक्झरी बसमधून अफू व प्रतिबंधित गुटखा वाहतूक; चालक अटकेत

रावेत परिसरात पोलिसांची कारवाई; 28 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Published on

पिंपरी: लक्झरी बसमधून अफू व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एकूण 28 लाखांचा मुद्दूेमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई 4 फेब्रुवारी रोजी रावेत परिसरात करण्यात आली.

Drug trafficking case
Pimpri Chinchwad Mayor Elected: पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे महापौर, उपमहापौर

या प्रकरणातील आरोपी श्रवणलाल वहादुरराम देवासी (36, रा. मूळ रा. पाली, राजस्थान; सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तो बसचालक आहे. त्याच्यासह धनराज चौधरी आणि विनोद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्षे यांनी फिर्याद दिली आहे.

Drug trafficking case
SSC HSC Exam CCTV: दहावी-बारावी परीक्षांसाठी सीसीटीव्ही सक्तीचे; पिंपरीत 90 टक्के केंद्रे सज्ज

रावेत येथे एका ट्रॅव्हल्समधून गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाला सापळा लावून ट्रॅव्हल्सची पाहणी केली. त्यामध्ये 449.57 ग्रॅम अफिम आणि प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

Drug trafficking case
Pimpri Suicide Case: पत्नी बेपत्ता; तणावात तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पोलिसांनी तब्बल 28 लाख पाच हजार 685 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रॅव्हल्सचालक श्रवणलाल याच्याकडे चौकशी केली असता त्याने अफिम हे धनराज चौधरी याने दिले असून ते पुणे येथे पोहोचवायचे आहे.

Drug trafficking case
Rabi Crops Growth: फेब्रुवारीत रब्बी पिकांची जोमदार वाढ; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

तर गुटखा हा पाली राजस्थान ट्रॅव्हल्स कार्यालयातून दिला असून तो विनोद नावाच्या व्यक्तीला द्यायचा असल्याचे चालक श्रवणलाल याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी अन्य दोघांवरदेखील गुन्हे दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news