Fire Safety Audit: पिंपळे गुरव नाट्यगृहात धोकादायक प्रकार; कालबाह्य अग्निशामक सिलिंडरमुळे सुरक्षा प्रश्नात

निळू फुले नाट्यगृहातील फायर सेफ्टी यंत्रणा निष्क्रिय असल्याचा आरोप; तातडीने ऑडिट व रिफिलिंगची मागणी
Nilu Phule Theatre
Nilu Phule TheatrePudhari
Published on
Updated on

उमेश सणस

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह येथे सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले अग्निशामक सिलिंडर कालबाह्य झाल्याचे उघड झाल्याने नागरिकांमधून तीव संताप व्यक्त होत आहे. आणीबाणीच्या प्रसंगी हे सिलिंडर निकामी ठरल्यास मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एक प्रकारे प्रेक्षकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे येथे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Nilu Phule Theatre
School Stationery Price Hike: पिंपरीत शालेय साहित्य महागले; स्टेशनरीच्या किमतीत 10 ते 15 टक्के वाढ

पिंपळे गुरव येथील नटसमाट निळू फुले नाट्यगृहामध्ये दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके, सामाजिक उपक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे येथे बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी अग्निशामक यंत्रणा सक्षम असणे अत्यावश्यक असताना, मुदत संपलेले अग्निशामक सिलिंडर आढळल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Nilu Phule Theatre
Apaar Id Card: पिंपरीत अपार आयडी प्रक्रिया ठप्प; पोर्टल बंदमुळे विद्यार्थ्यांचे काम थांबले

विशेष म्हणजे नाट्यगृहामध्ये प्रवेशद्वार आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग स्टेजच्या दोन्ही बाजू बॅकस्टेज परिसर, मेकअप रूम साऊंड आणि लाईट कंट्रोल विभाग इलेक्ट्रिकल पॅनल रूम, कॉरिडॉर जिने तसेच प्रेक्षक बसण्याच्या हॉल परिसरात फायर बॉल उज2 तसेच अइउ प्रकारातील असे एकूण सुमारे 40 अग्निशामक सिलिंडर आणि फायर बॉल ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, यापैकी अनेक यंत्रणांची मुदत संपल्याचे निदर्शनास आल्याने सुरक्षाव्यवस्थेच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांनी नाट्यगृहातील सर्व अग्निशामक सिलिंडरची तातडीने तपासणी करून रिफिलिंग करावे तसेच संपूर्ण फायर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

Nilu Phule Theatre
Pavana River Pollution: पिंपरीत पवना नदी प्रदूषण गंभीर; अतिक्रमणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

कालबाह्य सिलिंडर ठरतात निष्कामी

नाट्यगृहातील सिलिंडरवरील माहितीनुसार, त्यांची वैधता संपलेली आहे. तज्ज्ञांच्या मते कालबाह्य अग्निशामक सिलिंडरमध्ये गॅसचा दाब कमी होणे, आतील पावडरच्या गाठी तयार होणे किंवा फवारणी यंत्रणा निकामी होण्याची शक्यता असते. परिणामी आग लागल्यास ऐनवेळी सिलिंडर निष्काम ठरतात यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते.

लोका सांगे बह्मज्ञान...

महापालिकेचा कारभार म्हणजे लोका सांगे बह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण... एकीकडे खासगी इमारती, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना अग्निशाकम सिलिंडरबाबत कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. ते कालबाह्य आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते; परंतु प्रशासन स्वतःच्या ताब्यातील सार्वजनिक वास्तूंमध्ये लावलेल्या अग्निशामक सिलिंडरकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हे सिलिंडर केवळ शोभेची वस्तू म्हणून टांगून ठेवले होते का? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

Nilu Phule Theatre
PCMC Budget Scam: पिंपरीत 60 कोटींचा बोगस उपसूचना घोटाळा; मुख्य लेखा अधिकारी जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • नाट्यगृहातील सर्व कालबाह्य अग्निशामक सिलिंडर तातडीने बदलण्यात यावेत.

  • संपूर्ण नाट्यगृहाचे फायर सेफ्टी ऑडिट करावे.

  • सुरक्षाव्यवस्थेची नियमित तपासणी बंधनकारक करावी.

प्रभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कामांची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सध्या अंतिम कामाच्या आदेशाची प्रतीक्षा असून, ते मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता येत्या सात दिवसांच्या आत फायर सिलिंडर रिफिलिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल.

विशाल ठुबे, विद्युत स्थापत्य उपअभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, मनपा.

नाट्यगृहामध्ये आमच्या क्लासेसचे वार्षिक स्नेहसंमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक उपक्रम नियमित आयोजित केले जातात. अशा ठिकाणी अग्निशामक यंत्रणा कालबाह्य असल्याचे समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पालक आपल्या मुलांना विश्वासाने कार्यक्रमासाठी पाठवतात. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने सर्व फायर सिलिंडर रिफिल करून संपूर्ण फायर सेफ्टी ऑडिट करावे.

संजय कोरान, संस्थापक यश क्लासेस, पिंपळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news