

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. 14) सप्टेंबर रोजी भाजी मंडईमध्ये पितृपंधरवड्यामुळे लाल भोपळा, कारले अन् फळभाज्यांच्या दरात काहीशी वाढ झाली होती; मात्र टोमॅटोचे दर घसरले आहेत. 10 ते 15 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे.
बाजारात गवार 120 रुपये किलो दराने विक्री केली जात होती. तोंडल्याची आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. पालेभाज्यांचे भावही काही प्रमाणात वाढले आहेत. (Latest Pimpri News)
कांदे आणि बटाटे 20 ते 25 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. कोथिंबीरची जुडी 20 रुपयांना विक्री केली जात आहे. हिरवी मिरची 40 रुपये किलो दर होता. तर फळ भाज्यांमध्ये वांगी 60 रुपये किलो, दोडका 70 रुपये किलो, फ्लॉवर 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. लसूण 100 ते 120 रुपये किलो, तर आले 80 रुपये किलो आहे.
फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे:
गवार 200 रुपये किलो, शेवगा 60, वाटाणा 180, टोमॅटो 30, भेंडी 60, फ्लॉवर 80, कोबी 30 ते 40, मिरची 40, गाजर 50, शिमला 70 ते 80, लसूण 100 ते 120 रुपये; आले 80, वांगी 60, काकडी 60, कारले 50 ते 60, कांदे 100 रुपयांना चार किलो. बटाटा 30 रुपये किलो, बिन्स 80, पावटा 60, रताळी 100, लाल भोपळा 60, घोसाळी 60, दोडका 80 ते 90, बीट 50, दुधी 40 ते 50 , घेवडा 60 रुपये दराने उपलब्ध आहे.
पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रतिजुडी
कोथिंबीर 20, मेथी 20, पालक 20, शेपू 20, पुदिना 15, मुळा 25, चवळई 20, लाल माठ 25, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 15, चुका 20 रुपये दराने उपलब्ध आहे.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
बीट 80, वाल 60, दोडका 90, कारली 80, भरताची वांगी 60, गवार 120, शेवगा 90, भेंडी 80 ,मिरची 50, फ्लॉवर 70, कोबी 40, वांगी 70, तोंडली 100, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 90, पापडी 80, बीन्स 70, परवल 50, रताळी 120, सुरण 80, मद्रास काकडी 60, सिमला 100, वाटाणा 150, राजमा 80 काळा, राजमा लाल 80, बिन्स 90 रुपये दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 11, बटाटा 15, आले 30, लसूण 60, भेंडी 30, गवार 120 , टोमॅटो 10, वाटाणा 100, घेवडा 50, दोडका 45, हिरवी मिरची 25, दुधी भोपळा 25, काकडी 25, कारली 40, गाजर 25, फ्लॉवर 45, कोबी 25, वांगी 45, ढोबळी 40, शेवगा 90, घोसाळी 35, पावटा 45 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 5136 पालेभाजी 71350 (गड्डी), फळे आवक 594, कांदा 773, बटाटा 1343, आले 93, लसूण 4, भेंडी 109, गवार 31, टोमॅटो 606, वाटाणा 34, घेवडा 89, दोडका 63, हिरवी मिरची 144, दुधी भोपळा 94, काकडी 266, कारली 121, डांगर 44, गाजर 96, फ्लॉवर 298, कोबी 230, वांगी 193, ढोबळी 84, बीट 24, शेवगा 15, लिंबू 50, मका कणीस 200 क्विंटल अशी आवक झाली.
फळांचे भाव स्थिर, मागणी कमी
पिंपरी फळ बाजारात फळांची आवक वाढली असून फळांचे दर स्थिर आहेत. फळे साधारण 100 ते 150 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. पेरूची आवक वाढली असून 100 रुपयांस दोन किलो दराने विक्री केली जात आहे.
सफरचंद आणि डाळिंबाचे दर कमी झाले आहेत. सफरचंद 200 रुपये दीड किलो दराने तर डाळींब शंभर रुपये दराने उपलब्ध आहेत.
केळी 60 ते 70 रूरुपये डझन दर आहे. इतर फळांचे दर गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. पावसामुळे फळांच्या मागणीत देखील घट झाली आहे.
फळांचे दर प्रतिकिलो खालीलप्रमाणे :
देशी सफरचंद 200 - 250 रुपये तर मोसंबी 120, संत्री 160, डाळिंब 100 रु., पेरू 50, पपई 60 - 70 रुपये, अननस 120, केळी 70 रु. डझन, अननस 100 प्रतिनग, पिअर 140 रुपये, ड्रॅगनफ्रुट पांढरे 140 रुपये, किवी 120, तर आलुबुखार 150 रुपये.